Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उन्हात शूट नको, पण चांगली टीम असेल तर सगळं शक्य – तेजश्री प्रधान*

*उन्हात शूट नको, पण चांगली टीम असेल तर सगळं शक्य – तेजश्री प्रधान*

*स्वानंदी–समरचा वृक्षारोपण उपक्रम, गाण्यावर रोमँटिक क्षण*

*अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण झालं गाण्याचं शूट*


*'वीण दोघातली ही तुटेना'* मालिकेत येत्या आठवड्यात प्रेक्षकांना रोमँटिक क्षण आणि मनोरंजक वळणांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील तणाव, गैरसमज आणि नात्यांच्या गुंतागुंती मधून कथा पुढे सरकत असताना, एक विशेष ट्रॅक येणार आहे. स्वानंदी आणि समर आश्रमात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करतात. अनेक अडचणी, अडथळे आणि विरोध असूनही, ते हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करतात. काही लोक या उपक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु समर ठामपणे उभा राहून सर्व परिस्थिती हाताळतो.



या उपक्रमादरम्यान स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं अधिक घट्ट होताना दिसणार आहे. वृक्षारोपणाच्या या सुंदर वातावरणात, दोघांमध्ये जवळीक वाढणार असून एका रोमँटिक गाण्यावर त्यांच्यातील सुंदर क्षण पाहायला मिळणार आहे. या सगळ्याबद्दल बोलताना *स्वानंदी* म्हणजेच *तेजश्री प्रधान* म्हणाली, “या गाण्याच्या शूटसाठी मी आमच्या प्रोडक्शनला पूर्ण क्रेडिट देईन. कारण मी नेहमीच उन्हाळ्यात आउटडोअर शूट टाळण्याबाबत आग्रही असते. एवढ्या उष्णतेत काम करणं कठीण वाटतं, त्यामुळे गरज नसेल तर टाळावं असंच माझं मत असतं आणि हे फक्त आमच्या शोसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे. पण काही सीन खऱ्या वातावरणातच चांगले दिसतात. मला आमच्या प्रोडक्शनचं कौतुक वाटतं की त्यांनी भरपूर सावली आणि झाडं असलेलं लोकेशन निवडलं आणि आमची खूप काळजी घेतली. आम्ही ठाण्यात शूट करत होतो, पण वातावरण इतकं छान होतं की गावात शूट करत असल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःही उन्हाळ्यात आवश्यक ती काळजी घेत होते जसं की तुळशीच्या बियाचं पाणी, सब्जाचं पाणी आणि शॉटनंतर पांढरा स्टोल वापरणं. टीममधले सगळेच सुबोध दादा, हरीश आणि इतर कलाकार एकमेकांना सहकार्य करत होते.  त्या दिवशी आम्ही गाण्याबरोबरच वृक्षारोपणाचा सीन ही शूट केला, ह्या गाण्याचं शूट करण्यासाठी आमच्याकडे फार कमी वेळ होता. आम्ही अवघ्या ४५ मिनिटांत गाण्याचं शूट पूर्ण केलं. 

 

मला आशा आहे की हा सीन प्रेक्षकांना नक्की आवडेल. आणि शेवटी एवढंच म्हणेन, की आपण कलाकार म्हणून कधी कधी अशा परिस्थितीत शूट करतो पण  काही गोष्टी तश्याच छान दिसतात आणि जर सोबत चांगली टीम असेल तर गोष्टीं थोड्या सोप्या वाटतात .”


*तेव्हा बघायला विसरू नका वीण दोघातली ही तुटेना दररोज संध्या. ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.