*प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!*
‘कमिंग सून’ असं म्हणत उत्कंठावर्धक टीझर्सद्वारे अनेक आठवडे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर स्टार प्लसने अखेर आपल्या आगामी शो तारा च्या प्रीमियरची तारीख घोषित केली आहे. "तारा" ही नवी मलिका रोमँटिक ड्रामा असून १० मार्चपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. तारा या मालिकेतून भावनांनी भरलेली प्रेमकथा आणि कुटुंबातील गुंतागुंतीचे नातेसंबंध अनुभवायला मिळणार आहेत.
क्रुशाल आहुजा युवराजच्या भूमिकेत आणि कनिका कपूर ताराच्या भूमिकेत झळकणार असून ही मालिका दोन पूर्णपणे वेगळ्या जगातील पात्रांना एकत्र आणणार आहे. मालिकेचं कथाकथन तारा या पात्राभोवती फिरत जी युवराजच्या घरी मदतनीस म्हणून काम करते. नियती त्यांना जवळ आणते आणि त्यांच्यात प्रेम फुलत जात मात्र युवराजच्या कुटुंबाकडून होणारा विरोध त्यांच्या नात्यात भावनिक संघर्ष आणि नाट्य निर्माण करतो.
मालिकेच्या आधी आलेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना तारा आणि युवराजच्या छोट्या जगाची अनोखी झलक पाहायला मिळाली होती एक अशी कथा जिथे सामाजिक भेद आणि न बोललेल्या अडथळ्यांमध्येही प्रेम फुलताना दिसणार आहे. युवराज आपल्या भावना आणि कुटुंबाच्या अपेक्षांमध्ये अडकलेला दिसतो तर तारा ही स्त्री सन्मान तिची सशक्त ताकद आणि शांत सहनशक्तीचं प्रतीक म्हणून उभी राहते. या दोघांचा प्रवास हा नक्कीच उत्सुकतेचा असणार असून प्रेमासाठी असलेला संघर्ष, त्याग यांनी भरलेला आहे आणि हीच गोष्ट बघण प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.
प्राइम-टाइम स्लॉट आणि नव्या कथानकासह "तारा" ही मालिका समाजातील रूढींना आव्हान देणारी ठरणार यात शंका नाही. हृदयस्पर्शी प्रेमकथा सोबतीला मुख्य जोडी मधली केमिस्ट्री यातून उलगडणार आहे. प्रेमाचा भावनिक प्रवास गहिरेपणामुळे प्रेक्षकांमध्ये तारा बद्दल अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.
"तारा" पाहायला विसरू १० मार्चपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर !
