Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

“ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण...” – मेघना एरंडे जोशी*

*“ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण...” – मेघना एरंडे जोशी*


होळीच्या रंगांनी आणि नव्या सुरुवातीच्या उत्साहाने नटलेल्या या वातावरणात, अ *भिनेत्री मेघना एरंडे जोशी* आपल्या आवडत्या सणाविषयीच्या गोड आठवणींना उजाळा देत आहेत. *‘सनई चौघडे’* मालिकेतील *पमा परब* ही व्यक्तिरेखा साकारताना प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मेघना, होळीच्या आठवणी आणि यावर्षीच्या खास कारणांबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या.



होळी हा माझा अत्यंत आवडता सण आहे. या दिवशी आपण रंगांची उधळण करतो, संगीताचा आनंद घेतो आणि आईच्या हातच्या मऊ, लुसलुशीत पुरणपोळीचा आस्वाद घेतो. एकमेकांना रंग लावताना केलेली मस्ती, मैत्रिणींनी केलेला दंगा – या सगळ्यामुळे होळीचा दिवस अधिकच खास बनतो. मी दरवर्षी या सणाची आतुरतेने वाट पाहते, कारण या दिवशी आपण खऱ्या अर्थाने एकमेकांना भेटतो आणि आनंद व्यक्त करतो. लहानपणापासूनच होळी हा माझा सर्वांत आवडता सण राहिला आहे आणि तेव्हापासून मी उत्साहात होळी साजरी करत आली आहे. होळी दहनाच्या दिवशी आपण वाईट विचारांची आणि वाईट कृत्यांची होळी पेटवतो, तर धुलिवंदनाच्या दिवशी आप्तेष्टांसोबत आनंद साजरा करतो.


यावर्षीची होळी माझ्यासाठी विशेष आहे, कारण आमची नवी मालिका ‘सनई चौघडे’ मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात होळीच्या पवित्र महिन्यात, स्वामींच्या आशीर्वादाने होत असल्यामुळे वातावरणात अधिकच उत्साह आहे. *१६ मार्चपासून ‘सनई चौघडे’ पाहायला विसरू नका, सदैव तुमच्या झी मराठी वाहिनीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.