Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘झी चित्रगौरव २०२६’ च्या मंचावर भाऊ कदम, गौरव मोरे आणि निलेश साबळे यांच्या विनोदाची धमाल*

*‘झी चित्रगौरव २०२६’ च्या मंचावर भाऊ कदम, गौरव मोरे आणि निलेश साबळे यांच्या विनोदाची धमाल*

*‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ घेऊन येतोय मनोरंजनाची रंगतदार मेजवानी*




जितका दिमाखदार रेड कार्पेट होता तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक दिमाखदार यंदाचा *'झी चित्रगौरव पुरस्कार २०२६'* असणार आहे. यावर्षी *अमेय वाघ* आणि *निलेश साबळे* हे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. त्यांच्या सहज आणि एकसंध केमिस्ट्रीमुळे संपूर्ण सोहळ्याला एक वेगळीच रंगत येणार आहे. विनोद हीच त्यांची भाषा असल्याने हलक्याफुलक्या अंदाजात ते मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मा, तिची ताकद आणि उज्ज्वल भविष्य उलगडताना दिसतील. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी सुरुवातच होणार आहे अमेय वाघ यांच्या दमदार पोवाड्याने. मराठी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी *अभिनेता अंकुश चौधरी* यांच्यावर आधारित एक खास सादरीकरणही खास आकर्षण असणार आहे. सुपरस्टार, स्टाईल आयकॉन, अॅक्शन आणि रोमँटिक हिरो अशा विविध भूमिकांतील त्यांच्या प्रवासाला या अॅक्टमधून सलाम केला जाणार आहे.




विनोदाची फटकेबाजीही या सोहळ्यात रंगत आणणार आहे. *‘लॉयर साबळे यांच्या कोर्टात’* *महेश कोठारे* यांच्यावर आरोप ठेवत एक खास कोर्टरूम सादरीकरण सादर होईल. एका विनोदी सादरीकरणातुन बॉलिवूड आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार्स आदित्य सरपोतदार यांच्या भूमिकेसाठी ऑडिशन देताना दिसणार आहेत. या भन्नाट अॅक्टमध्ये विविध लोकप्रिय कलाकारांच्या शैलीची मजेशीर झलक अनुभवायला मिळेल. *भाऊ कदम  ‘धुरंधर’* मधील रणवीर सिंगच्या ढंगात, *गौरव मोरे ‘केजीएफ’* मधील यशच्या अंदाजात, *निलेश साबळे ‘धुरंधर’* मधील संजय दत्तच्या शैलीत दिसणार आहेत. 

 




नृत्याविष्कारांचीही विशेष मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. *अमृता खानविलकर* आणि *आशिष पाटील* यांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना खिळवून  ठेवेल. सोनाली कुलकर्णी यांचे मोहक आणि आकर्षक सादरीकरण, तसेच *ऋता  दुर्गुळे* आणि *ललित  प्रभाकर* यांचा रोमँटिक सादरीकरणही या सोहोळ्याचे खास आकर्षण असणार आहे. एकूणच काय तर मराठी अभिमानाचा जल्लोष, दमदार सादरीकरणे, विनोद, रोमान्स आणि भव्य नृत्यरचना अशा विविध पैलूंनी यंदाचा 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२६' अविस्मरणीय ठरणार आहे.




*तेव्हा पाहायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६'  भव्य सोहळा १४ मार्च २०२६ संध्या ७:०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*\

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.