Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*स्टार प्लस घेऊन येत आहे टीव्हीवरील सर्वात लाडकी जोडी; श्रुती झा - शबीर अहलुवालिया येणार ‘तुम देना साथ मेरा’साठी एकत्र!*

 *स्टार प्लस घेऊन येत आहे टीव्हीवरील सर्वात लाडकी जोडी; श्रुती झा - शबीर अहलुवालिया येणार ‘तुम देना साथ मेरा’साठी एकत्र!*


https://www.instagram.com/reel/DV4ip6NChWk/?igsh=eGl4bWtyYTE0NTZj


टेलिव्हिजन विश्वात कायम अग्रगण्य असलेलं चॅनल असलेलं स्टार प्लस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवनवीन मालिका घेऊन येत असतात आणि अश्यातच स्टार प्लस अजून एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं कळतंय. नियती साथ आणि भावनांनी भरलेली नवी कथा  असलेली "तुम देना साथ मेरा" या मालिकेत प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांची बहुप्रतीक्षित ऑन-स्क्रीन पुनर्भेट पाहायला मिळणार आहे. श्रुती झा आणि शबीर अहलुवालिया ही जोडी अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे आणि आता ते अपराजिता आणि रक्षित या भूमिकांमध्ये पुन्हा एकत्र येणार असल्याने रसिक प्रेक्षकांना या मालिकेबद्दल टीव्हीप्रेमींमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे.



अलीकडेच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये एका योगायोगाने झालेल्या भेटीची झलक पाहायला मिळते जी पुढे उलगडणाऱ्या गूढ आणि भावनिक कथेचे संकेत देते. प्रोमोमध्ये अपराजिता आणि रक्षित हे दोन अनोळखी व्यक्ती अचानक एकमेकांना धडकतात. रक्षित जमिनीवर पडतो आणि अपराजिताला विचारतो की ती इतक्या घाईत का आहे. त्यावर अपराजिता एक विचार करायला लावणारी ओळ म्हणते कधी कधी माणसं कुठेतरी पोहोचण्यासाठी घाई करत नाहीत, तर काहीतरी मागे सोडून जाण्यासाठी घाई करत असतात.


हा प्रभावी क्षण या दोघांच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे आणि नियतीने त्यांच्या वाट्याला काय लिहून ठेवलं आहे याबद्दलची उत्सुकता वाढवतो. भावनांच्या विविध छटा, रंजक कथानक आणि टीव्हीवरील सर्वात आवडत्या जोडीच्या पुनरागमनासह तुम देना साथ मेरा ही मालिका प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कथा घेऊन येण्याचे आश्वासन देते.


श्रुती झा आणि शबीर अहलुवालिया यांची ही पुनर्भेट नक्कीच या मालिकेचं  मोठ आकर्षण आहे आणि त्यांच्या जादुई केमिस्ट्रीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


लवकरच पाहा ‘तुम देना साथ मेरा’ फक्त स्टार प्लसवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.