*“एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही सुप्रसिध्द जोडी झळकणार स्टार प्लसच्या आगामी "तारा" मालिकेत!*
टेलिव्हिजन विश्वातील आघाडीच्या स्टार प्लस चॅनलवर "तारा" हा शो लवकरच रोमँस आणि भावनांची एक नवी कहाणी घेऊन येत असून ही मालिका तारा आणि युवराज यांच्या प्रेमाच्या नव्या प्रवासाची हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या मालिकेत कृषल आहुजा युवराजच्या भूमिकेत तर कनिका कपूर तारा च्या भूमिकेत दिसणार आहेत.
"तारा" च्या कथेने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असली तरी या मालिकेची अजून एक खास गोष्ट म्हणजे टीव्हीवरील एक नॉस्टॅल्जिक जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर एकत्र येत आहे. गुरदीप कोहली आणि गिरीश सहदेव ज्यांना प्रेक्षकांनी एकेकाळी त्यांच्या पती-पत्नीच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीसाठी खूप प्रेम दिले होते ते या निमित्ताने ‘तारा’मध्ये पुन्हा एकत्र येत आहेत. त्यांच्या आधीच्या जोडीला त्यांच्या सहज मोहकतेसाठी, विनोदासाठी आणि भूमिकांमधील नैसर्गिकतेसाठी प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र पाहणे हे टीव्ही रसिकांसाठी आणि चाहत्यांसाठी नक्कीच आनंददायी बाब ठरणार आहे.
या मालिकेत गिरीश सहदेव युवराजच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसतील. या भूमिकेत ते एका लक्षवेधी ट्रान्सफॉर्मेशनसह अधिक फिट लूक आणि नव्या ऑन-स्क्रीन अवतारात दिसणार आहेत. गुरदीप कोहलीदेखील कथानकात एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील ज्यामुळे कथेला अधिक खोली मिळणार आहे.
जरी ते पुन्हा एकत्र दिसणार असले, तरी ‘तारा’मधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिलेल्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिका साठी सगळेच उत्सुक आहे.
तरुण प्रेमकथेभोवती फिरणारा कथानक आणि परिचित चेहरे पुन्हा स्क्रीनवर परत येत असल्यामुळे ‘तारा’ हा शो नक्कीच पाहण्यासारखा ठरणार आहे यात शंका नाही. तारा आणि युवराज यांच्या प्रेमकथेचा प्रवास कसा उलगडतो आणि गुरदीप कोहली व गिरीश सहदेव ही आवडती जोडी आपल्या नव्या पात्रांमधून या कथेला कशी खास रंगत आणते, हे पाहण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे.
मालिकेच्या कथेत तारा आणि युवराज यांची गोष्ट दाखवली जाणार असून जे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. काळ जसजसा पुढे जातो तसतशी त्यांची मैत्री प्रेमात बदलताना दिसते. ज्याची झलक सुरुवातीच्या प्रोमोमध्ये त्यांच्या उबदार आणि हृदयस्पर्शी केमिस्ट्रीमधून बघायला मिळते. मात्र त्यांचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नाही आहे दोघे खूप वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे त्यांच्या नात्यातील वर्गभेद ही एक मोठी अडचण ठरू शकणार का ? त्यांचे प्रेम या आव्हानांवर मात करू शकेल का हे पाहणे अधिक रंजक ठरणार आहे.
‘तारा’ पाहायला विसरू नका १० मार्चपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर !


