*दोन दशके पूर्ण झाल्यानिमित्त राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’च्या निर्मात्यांकडून टीमसाठी खास आणि संस्मरणीय स्पेशल स्क्रीनिंग*
*‘रंग दे बसंती’: 20 वर्षांनंतरही जोश तसाच कायम, स्पेशल स्क्रीनिंगमध्ये टीमची उपस्थिती*
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाने केवळ फिल्ममेकिंगची भाषा बदलली नाही, तर सामाजिक जाणीवांशी निगडित कथा मांडण्याच्या शैलीलाही नवी दिशा दिली. आमिर खान, आर. माधवन, सिद्धार्थ सूर्यनारायण, सोहा अली खान, शर्मन जोशी, कुणाल कपूर, अनुपम खेर आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला हा चित्रपट आजही एक नेशनवाइड फेनोमेनन ठरला असून, आपल्या ताकदवान कथानकामुळे आणि निर्भीड मांडणीमुळे तो सतत चर्चेत राहतो आणि प्रेक्षकांशी खोलवर नाते जोडतो.
30 जानेवारी रोजी होणारी ही स्पेशल स्क्रीनिंग माजी खासदार श्री. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या दु:खद घटनेबद्दल शोक व्यक्त करत निर्मात्यांनी सोशल मीडियावर कार्यक्रम पुढील तारखेला घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आणि राज्य शोक काळात आपल्या संवेदनाही व्यक्त केल्या. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले—
“श्री. अजित पवार जी यांच्या अकाली निधनामुळे आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या राज्य शोक कालावधीचा विचार करता, 30 जानेवारी रोजी होणारी ‘रंग दे बसंती’ची स्पेशल स्क्रीनिंग सध्या स्थगित करण्यात येत आहे. या दु:खाच्या क्षणी आम्ही देशासोबत उभे आहोत आणि आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.
धन्यवाद.”
आता ही विशेष स्क्रीनिंग आज, 6 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली असून, यामध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासह आमिर खान, कुणाल कपूर, सोहा अली खान, सिद्धार्थ सूर्यनारायण आणि शर्मन जोशी उपस्थित राहणार आहेत.
एक खरी कल्ट क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या 20व्या वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण टीमसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि नॉस्टॅल्जिक ठरला आहे. दोन दशकांनंतर सर्व कलाकार आणि निर्माते आपल्या या अविस्मरणीय कलाकृतीला पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी एकत्र आले आहेत.
‘रंग दे बसंती’ आजही प्रेक्षकांच्या मनात आपले खास आणि अढळ स्थान टिकवून आहे. त्याची निर्भय मांडणी आणि देशभक्तीची भावना जागवण्याची ताकद यासाठी तो आजही लक्षात ठेवला जातो.
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’ ही काही बेफिकीर तरुणांची कथा आहे, ज्यांचे आयुष्य त्या वेळी बदलते, जेव्हा ते स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित एका डॉक्युमेंटरीवर काम करू लागतात. जसजसे ते क्रांतिकारकांच्या भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देतात, तसतसे त्यांना भ्रष्टाचार आणि अन्यायाची कटू वास्तविकता समजू लागते. ही जाणीव त्यांना एक ठाम आणि परिणामकारक पाऊल उचलण्यास भाग पाडते—आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतो.

