Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी 2’मधील भावनिक ट्रॅक ‘ओ माय री’ प्रदर्शित; श्रेया घोषालच्या आवाजाने रसिकांच्या मनाला स्पर्श*

 *विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी 2’मधील भावनिक ट्रॅक ‘ओ माय री’ प्रदर्शित; श्रेया घोषालच्या आवाजाने रसिकांच्या मनाला स्पर्श*


द केरळ स्टोरी 2 – गोज़ बियॉन्ड चा टीझर पहिल्या भागापेक्षा अधिक तीव्र आणि धारदार भासतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट तीन हिंदू तरुणींची अस्वस्थ करणारी कथा मांडतो. या भूमिका उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांनी साकारल्या आहेत. तीन मुस्लिम तरुणांशी नातेसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अंधार दाटू लागतो. प्रेमाने सुरू झालेली ही कहाणी हळूहळू एका भयावह आणि कटकारस्थानी सत्याचा पर्दाफाश करते, ज्याचा केंद्रबिंदू धार्मिक धर्मांतरण आहे. चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहोचत असतानाच, दरम्यान चित्रपटातील अत्यंत भावूक गीत ‘ओ माय री’ प्रदर्शित करण्यात आले असून, या गाण्याने प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या हादरवून टाकले आहे.



आई आणि लेकरामधील अतूट नात्याला समर्पित असलेले हे हृदयस्पर्शी गीत आता रसिकांच्या भेटीला आले आहे. श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाजात सादर झालेले हे गाणे थेट मनाला भिडते. मन्नन शाह यांची सोलफुल संगीत रचना आणि मनोज मुंतशिर यांचे भावनांनी ओतप्रोत शब्द या गीताला आणखी खास बनवतात. आईच्या हृदयात असलेले आपुलकीचे, सुरक्षिततेचे आणि नि:स्वार्थ प्रेम या गाण्यातून प्रकर्षाने जाणवते. गाणे संपल्यानंतरही त्याची धून मनात घोळत राहते आणि जणू एखाद्या हलक्या आलिंगनासारखा शांततेचा अनुभव देते.


‘ओ माय री’ हे विपुल अमृतलाल शाह आणि श्रेया घोषाल यांची आणखी एक संस्मरणीय आणि जादुई कलाकृती ठरली आहे. याआधीही या जोडीने अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत. फोर्स (2011) मधील ‘मैं चली’, अ‍ॅक्शन रिप्ले (2010) मधील ‘ओ बेख़बर’, ‘बाकी मैं भूल गई’ आणि ‘तेरा मेरा प्यार’ यांसारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली आहेत.

https://youtu.be/CYQWsAlp3xY?si=JYyum_6xrzUlPqQv



टीझरमधील ठसठशीत संवादच चित्रपटाची खरी भावना आणि बाणा स्पष्ट करतो —

“आता सहन करणार नाही… लढा देऊ!”

द केरळ स्टोरीच्या प्रचंड प्रभावानंतर, ज्याने आपल्या थेट आणि निर्भीड कथनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते, त्याचा सिक्वेल आणखी पुढे जाण्याचे आश्वासन देतो — कम्फर्ट झोनच्या पलीकडे, शांततेच्या आड न लपता आणि नकाराच्या मर्यादांपलीकडे. कामाख्या नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या द केरळ स्टोरी 2 – गोज़ बियॉन्ड या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून, आशिन ए. शाह यांनी सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.