Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Motorola Signature डीएक्‍सओएमएआरके* कडून गोल्‍ड लेबल कॅमेरा मान्यतेसह इमेजिंगमध्‍ये नवीन जागतिक मापदंड

 Motorola ने Motorola Signature लाँचसह भारतातील प्रमुख श्रेणीमध्ये विशेष भर केली, या नवीन स्‍मार्टफोनमध्‍ये डीएक्‍सओएमएआरके^ द्वारे प्रमाणित जगातील सर्वोत्तम कॅमेरा, भारतातील पहिल्‍या 24X7 प्रीव्हिलेज सर्विसेससह सिग्‍नेचर क्‍लब, आकर्षक फिनिशेस् आणि प्रमुख कार्यक्षमता व एआय आहे, किंमत फक्‍त Rs. 54,999* पासून सुरू होते 

 

Motorola Signature डीएक्‍सओएमएआरके* कडून गोल्‍ड लेबल कॅमेरा मान्यतेसह इमेजिंगमध्‍ये नवीन जागतिक मापदंड स्‍थापित करतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये जगातील पहिला व सर्वात प्रगत सोनी एलवायटीआयए बी2बी मेन कॅमेरा आहे, ज्‍यामध्‍ये डॉल्‍बी व्हिजन व्हिडिओ व 8के व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ज्‍यामधून अपवादात्‍मक सुस्‍पष्‍टता, गतीशील रेंज आणि पॅन्‍टोन प्रमाणित अचूक रंगसंगतीसह प्रोफेशनल-ग्रेड फोटोग्राफी व सिनेमॅटिक व्हिडिओ निर्मितीची खात्री मिळते. 

Motorola Signature अत्‍यंत सडपातळ प्रोफाइलसह सुधारित लक्‍झरी कारागिरीचा अनुभव देतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये फॅब्रिक-प्रेरित प्रीमियम फिनिशसह अचूकरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेली एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्‍युमिनिअम फ्रेम आहे, जेथे वैशिष्‍ट्यपूर्ण प्रीमियम डिझाइन शैलीमध्‍ये आकर्षकता, आरामदायीपणा आणि टिकाऊपणाचे संयोजन आहे. 

हार्डवेअरपलीकडे प्रीमियम मालकीहक्‍क अनुभव देणारा सिग्‍नेचर विशेष सिग्‍नेचर क्‍लब प्रीव्हिलेजेस् देणारा भारतातील पहिला स्‍मार्टफोन आहे, ज्‍यामध्‍ये 24X7 लाइव्‍ह एजंट सपोर्ट आहे, ज्‍यामधून सर्वोत्तम जीवनशैली अनुभव, प्रीमियम अॅक्‍सेस सर्विसेस् आणि राहणीमान उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले सर्वोत्तम फायदे मिळतात. 

क्‍वॉलकॉमच्‍या प्रमुख व आधुनिक स्‍नॅपड्रॅगन® 8 जेन 5 मोबाइल प्‍लॅटफॉर्मद्वारे समर्थित सिग्‍नेचर तडजोड न करणारी प्रमुख कार्यक्षमता देतो. या स्‍मार्टफोनमधील प्रगत कॉपर मेश लिक्विड मेटल कूलिंग सिस्‍टम अधिक गेमिंग, मल्‍टीटास्किंग आणि एआय-संचालित वर्कलोडदरम्‍यान शाश्वत सर्वोच्‍च कार्यक्षमतेची खात्री देते.   

मोटोरोलाने आपल्‍या नवीन परिसंस्‍था उत्‍पादनाची देखील घोषणा केली, ते म्‍हणजे पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच, जे प्रगत वेलनेस ट्रॅकिंग देते जसे झोपेबाबत माहिती, रिकव्‍हरी, एसपीओ2 आणि हार्ट रेट ट्रॅकिंग, तसेच क्‍लासिक घड्याळाचे लुक व फिल कायम ठेवते.

मोटो वॉचमध्‍ये कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास ३ चे संरक्षण असलेली विभागातील एकमेव अॅल्‍युमिनिअम डिझाइन आहे, ज्‍याला पूरक आयपी68 + 1एटीएम जलरोधक, 1.4 इंच वर्तुळाकार ओएलईडी डिस्‍पले, ड्युअल-बँड जीपीएस आहे आणि मोटो वॉच सतत डिस्‍प्‍ले सुरू राहिला तरी जवळपास 7 दिवसांर्यंत बॅटरी कार्यरत राहण्‍याची खात्री देते. 

Motorola Signature 12 जीबी रॅम + 256 जीबी, 16 जीबी रॅम + 512 जीबी आणि 16 जीबी रॅम + 1 टीबी स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्स या 3 स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्ससह पॅन्‍टोन™ मार्टिनी ऑलिव्‍ह व पॅन्‍टोन™ कार्बन (डार्क ब्‍ल्‍यू) या रंगांमध्‍ये फ्लिपकार्ट, Motorola.in आणि आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल. या स्‍मार्टफोनीची प्रभावी लाँच किंमत INR 54,999* फक्‍त आहे.  

पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच 6 व्‍हेरिएण्‍टमध्‍ये उपलब्‍ध असेल, जेथे प्रभावी लाँच किंमत सिलिकॉन व्‍हेरिएण्‍टसाठी फक्‍त Rs.5,999 आणि मेटल व लेदर व्‍हेरिएण्‍ट्ससाठी फक्‍त Rs.6,999 आहे.     

मुंबई, २३ जानेवारी २०२६: मोटोरोला या मोबाइल तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी आणि भारतातील आघाडीच्‍या एआय स्‍मार्टफोन ब्रँडने आज भारतात Motorola Signature च्‍या लाँचची घोषणा केली, जेथे अत्‍याधुनिकता व लक्‍झरी वैयक्तिककरणासह अल्‍ट्रा-प्रीमियम प्रमुख स्‍मार्टफोनमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केला आहे. तडजोड न करणा-या उत्‍कृष्‍टतेचा शोध घेणा-या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला सिग्‍नेचर प्रमुख अनुभवांना नव्‍या उंचीवर घेऊन जातो. या स्‍मार्टफोनमध्‍ये जागतिक दर्जाची कॅमेरा नाविन्‍यता, सुधारित लक्‍झरी कारागिरी, नेक्‍स्‍ट-जनरेशन कार्यक्षमता आणि सर्वोत्तम जीवनशैली प्रीव्हिलेजेस् आहेत. या प्रीमियम परिसंस्‍थेला अधिक प्रबळ करत मोटोरोला पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच देखील लाँच केला आहे, जो कालातीत वॉच डिझाइनमध्‍ये विभागातील अग्रणी वेलनेस ट्रॅकिंग देतो.  



Motorola Signature मध्‍ये जगातील एकमेव ट्रिपल सोनी एलवायटीआयए™ प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्‍टम आहे, जी डीएक्‍सओएमएआरके गोल्‍ड लेबल सर्टिफिकेशनसह प्रमाणित आहे, ज्‍यामधून वास्‍तविक स्थितींमध्‍ये अपवादात्‍मक फोटो व व्हिडिओ कार्यक्षमतेची खात्री मिळते. डीएक्‍सओएमएआरकेच्‍या कॅमेरा परफॉर्मन्‍स इंडेक्‍सवर 164 च्‍या कॅमेरा स्‍कोअरसह मोटोरोला सिग्‍नेचर भारतातील INR 100,000 श्रेणी अंतर्गत पहिल्‍या क्रमांकाचा कॅमेरा फोन बनला आहे. या सिस्‍टममधील खासियत म्‍हणजे 50 मेगापिक्‍सल सोनी एलवायटीआयए™ बी2बी मेन कॅमेरा. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा 50 मेगापिक्‍सल सेन्‍सर प्रगत सिनेमॅटिक इमेजिंग देतो, ज्‍यामध्‍ये जवळपास 60 एफपीएसमधील 8के व 4के मधील डॉल्‍बी व्हिजन® व्हिडिओ रेकॉर्डिंग, क्‍वॉड पिक्‍सल तंत्रज्ञान, प्रगत नॉईज रिडक्‍शन आणि 3.50 ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन आहे, ज्‍यामधून कोणत्‍याही प्रकाश स्थितीमध्‍ये अत्‍यंत स्थिरपणे फोटो कॅप्‍चर होण्‍याची खात्री मिळते. याला पूरक 50 मेगापिक्‍सल सोनी एलवायटीआयए™ 600 पेरिस्‍कोप कॅमेरासह 3x ऑप्टिकल झूम, ओआयएस आणि जवळपास 100x सुपर झूम प्रो, 50 मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड + मॅक्रो व्हिजन कॅमेरासह 1220 फिल्‍ड ऑफ व्‍ह्यू व क्‍लोज-फोकस मॅक्रो क्षमता आणि 60 एफपीएसमध्‍ये 4के व्हिडिओ क्षमता असलेला 50 मेगापिक्‍सल सोनी एलवायटीआयए™ 500 फ्रण्‍ट कॅमेरा आहे. संपूर्ण कॅमेरा सिस्‍टम पॅन्‍टोन™ व्‍हॅलिडेटेड कलर आणि स्किनटोन™ कॅलिब्रेशन व मल्‍टीस्‍पेक्‍ट्रल 3-इन-1 लाइट सेन्‍सरसह अधिक सुधारण्‍यात आली आहे, ज्‍यामधून अचूक एक्‍स्‍पोजर, व्‍हाइट संतुलन आणि वास्‍तविक रंगसंगती निर्मितीची खात्री मिळते.   

इमेजिंग अनुभवामध्‍ये अधिक भर करणारे वैशिष्‍ट्य म्‍हणजे मोटो एआय व गुगल एआय वैशिष्‍ट्यांची प्रगत श्रेणी, जे प्रोफेशनल दर्जाची फोटोग्राफी सहज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. एआय सिग्‍नेचर स्‍टाइल सीननुसार कलर, कॉन्‍ट्रॅस्‍ट व टोनशी जुळून जाते, तर एआय अॅक्‍शन शॉट सुधारित शटर गती व सुस्‍पष्‍टतेसह अधिक हालचाल असलेल्‍या क्षणांना थांबवते. एआय ग्रुप शॉट विविध फ्रेम्‍सना एकत्र करत प्रत्‍येक चेहरा सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देते आणि एआय ऑटो स्‍माइल कॅप्‍चर आपोआपपणे परिपूर्ण क्षणाला कॅप्‍चर करते. एआय फोटो एन्‍हान्‍समेंट इंजिन, एआय अॅडप्टिव्‍ह स्‍टेबिलायझेशन आणि एआय कलर ऑप्टिमायझेशन रिअल टाइममध्‍ये काम करत तपशील, गतीशील श्रेणी व नैसर्गिक स्किन टोन्‍सना अधिक आकर्षक करतात. गुगल फोटोज एआय टूल्‍स जसे एआय मॅजिक एडिटर, एआय मॅजिक इरेजर, एआय फोटो अनब्‍लर, फोटो टू व्हिडिओ आणि सिनेमॅटिक फोटोज फोटो कॅप्‍चर केल्‍यानंतर उत्तम एडिटिंग, संघटित व कथानकाच्‍या स्‍वरूपात सादर करण्‍याची सुविधा देतात.

कारागिरी व संवदेशनशील भावनेवर फोकस करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या मोटोरोला सिग्‍नेचरमध्ये लक्‍झरीअसपणे सुधारित, अत्‍यंत सडपातळ डिझाइन आहे, जी ब्रश एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्‍युमिनिअम व संपन्‍न फॅब्रिक-प्रेरित फिनिशेसमधून तयार करण्‍यात आली आहे. फक्‍त 6.99 मिमी जाडी आणि 18 किलो वजन असलेला हा डिवाईस हातामध्‍ये सहजपणे सामावून जातो, तसेच दिवसभर वापरासाठी कोमल, कॉन्‍चर कडांसह परिपूर्ण संतुलित फ्रेम आहे. या डिझाइनला सिग्‍नेचर सीएमएफ एक्झिक्‍युशनसह वाढवण्‍यात आले आहे, जेथे विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेले टेक्‍स्‍चर्स व फिनिशेस् लुक व फिल वाढवतात, ज्‍यासह डिवाईसच्‍या विशिष्‍ट आधुनिक व अल्‍ट्रा-प्रीमियम आकर्षकतेमध्‍ये अधिक वाढ झाली आहे. पॅन्‍टोन™ निर्मित रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या प्रत्‍येक व्‍हेरिएण्‍टमध्‍ये अद्वितीय प्रीमियम फिनिश पॅन्‍टोन™ मार्टिनी ऑलिव्‍ह आहे, ज्‍यामध्‍ये ट्विल-प्रेरित टेक्‍स्‍चर आहे, ज्‍यामधून सुधारित क्षमतेची खात्री मिळते, तसेच पॅन्‍टोन™ कार्बन लिनेन-प्रेरित टेक्‍स्चर फिनिश देते, ज्‍यामधून आधुनिकता, कालातीत आकर्षकता आणि लक्‍झरी दिसून येते. 



हार्डवेअरपलीकडे अनुभवाला घेऊन जात Motorola Signature हा विशेष सिग्‍नेचर क्‍लब प्रीव्हिलेजेस् देणारा भारतातील पहिला स्‍मार्टफोन आहे. या डिवाईसमध्‍ये सर्विससह 24/7 ऑन-डिमांड प्रीव्हिलेजचा समावेश करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक मोटोरोला सिग्‍नेचर वापरकर्त्‍याला पूरक एक वर्षाचे सिग्‍नेचर क्‍लब अॅप स‍बस्क्रिप्‍शन मिळते, ज्‍यासह प्रवास, गोल्फिंग, वाइन व डायनिंग, कला व संस्‍कृती, खरेदी व व्‍यवसाय सेवांमध्‍ये सर्वोत्तम सपोर्ट मिळतो, तसेच दैनंदिन जीवनशैली साह्य जसे वेलनेस सत्रे, पाळीव प्राण्‍यांची काळजी, लॉण्‍ड्री आणि इव्‍हेण्‍ट समन्‍वयन मिळते. वापरकर्त्‍यांना अद्वितीय अनुभव देण्‍यासाठी सिग्‍नेचर क्‍लब विशेष वेलकम ऑफर देखील देते, जेथे पहिली सर्विस जवळपास INR 6,000^^ पर्यंत मोफत आहे. आधुनिक, महत्त्वाकांक्षी जीवनशैलीशी जुळून जाण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलेले सिग्‍नेचर क्‍लब अद्वितीय सोयीसुविधा, वैयक्तिकृत पाठिंबा आणि प्रीमियम अनुभवांसह स्‍मार्टफोन मालकीहक्‍काला अधिक उत्‍साहित करते. 

Motorola Signature ला शक्‍ती देते स्‍नॅपड्रॅगन® 8 जेन 5 मोबाइल प्‍लॅटफॉर्म, जो बिल्‍ट-इन को-पायलट व परप्‍लेक्सिटीसह प्रमुख श्रेणीची, एआय-केंद्रित कार्यक्षमता देतो. ऑक्‍टा-कोअर सीपीयूसह जवळपास 3.8 गिगाहर्ट्झ सर्वोच्‍च क्‍लॉक गती आणि 3 दशलक्षपेक्षा जास्‍त अंतूतू स्‍कोअर असलेली चिपसेट गेमिंग, मल्‍टीटास्किंग, कन्‍टेन्‍ट निर्मिती व दैनंदिन वापरादरम्‍यान अत्‍यंत सुलभ कार्यक्षमतेची खात्री देते. प्रीमियम सीपीयू व जीपीयू आर्किटेक्‍चर जवळपास 36 टक्‍के जलद सीपीयू कार्यक्षमता आणि 11 टक्‍के सुधारित जीपीयू कार्यक्षमता देते, ज्‍यामधून सहजपणे व्हिज्‍युअल्‍स दिसण्‍याची, जलदपणे अॅप लाँच होण्‍याची आणि सर्वोत्तम गेमिंगची खात्री मिळते. क्‍वॉलकॉम® एआय इंजिन रिअल-टाइम, ऑन-डिवाईस जेन एआय अनुभवांसाठी जवळपास 46 टक्‍के सुधारित एनपीयू कार्यक्षमता देते. शाश्वत सर्वोच्‍च कार्यक्षमतेला प्रगत थर्मल सिस्‍टमसह विशाल 6,002 मिमी2 वेपर चेम्‍बर आणि प्रगत आर्क्टिकमेश कूलिंग सिस्‍टमचे पाठबळ आहे, जी अधिक वेळ वर्कलोडदरम्‍यान तापमान जवळपास 4.4 अंश सेल्सिअसपर्यंत थंड ठेवते. जवळपास 16 जीबी एलपीडीडीआर5एक्‍स, रॅम बूस्‍ट आणि जवळपास 1 टीबी यूएफएस 4.1 स्‍टोरेजसह मोटोरोला सिग्‍नेचर विनासायास मल्‍टीटास्किंग, जलद डेटा उपलब्‍धता आणि 8के कन्‍टेन्‍टसाठी व्‍यापक स्‍पेस, तसेच गतीशील, लो-लेण्‍टसी कनेक्‍शन्‍ससाठी विभागातील अग्रणी 5जी कनेक्‍टीव्‍हीटी, वाय-फाय 7 व प्रगत नेटवर्क ऑप्टिमायझेशन देतो.  

Motorola Signature मध्‍ये 6.8-इंच सुपर एचडी (1.5के) एक्‍स्‍ट्रीम एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह इन्‍फानाइट कॉन्‍ट्रॅस्‍ट, डॉल्‍बी व्हिजन® आणि एचडीआर10+ आहे, ज्‍यामधून आकर्षक व्हिज्‍युअल्‍स, आकर्षक रंगसंगती आणि सिनेमॅटिक सखोलता मिळते. 6200 नीट्स सर्वोच्‍च ब्राइटनेस, 100 टक्‍के डीसीआय-पी3 वाइट कलर गम्‍यूट, 10-बीट कलर डेप्‍थ आणि 165 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह स्क्रिन सुस्‍पष्‍टता, सहज परस्‍परसंवाद आणि सुलभ गेमिंगची खात्री देते. पॅन्‍टोन™ व्‍हॅलिडेटेड डिस्‍प्‍ले व स्किनटोन™ अचूकता, डॉल्‍बी-समर्थित डायनॅमिक व्हिडिओ एन्‍हान्‍समेंट, ऑल्‍वेज ऑन डिस्‍प्‍ले, स्‍मार्ट वॉटर टच, प्रगत आय-केअर प्रोटेक्‍शन्‍स आणि कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस® 2 सह सुधारित डिस्‍प्‍ले आकर्षक व्हिज्‍युअल्‍ससह टिकाऊपणा आणि दैनंदिन उपयुक्‍ततेची खात्री देतो. 

Motorola Signature मोटो एआय 2.0 सह येतो, जेथे समर्पित एआय कीच्‍या माध्‍यमातून त्‍वरित उपलब्‍धतेसह उच्‍च दर्जाचे इंटेलिजन्‍स मिळते. या डिवाईसमध्‍ये नेक्‍स्‍ट मूव्‍ह संदर्भीय सूचना आहेत, ज्‍या स्क्रिनवर सुरू असलेल्‍या गोष्‍टींना समजून घेते आणि रिअल टाइममध्‍ये योग्‍य कृती करते. तसेच एआय इमेज स्‍टुडिओ, स्‍केच टू इमेज, स्‍टाइल सिंक, टेक्‍स्‍ट टू स्टिकर आणि अवतार निर्मिती असे सर्जनशील टूल्‍स देखील आहेत. कॅच मी अप 2.0, पे अटेंशन लाइव्‍ह ट्रान्स्क्रिप्‍शन्‍स, एआय पेलिस्‍ट स्‍टुडिओ, ग्‍लोबल सर्च, ऑटो स्क्रिनशॉट ब्‍लर आणि धीस ऑन दॅटच्‍या माध्‍यमातून सहजपणे विविध डिवाईसवर टास्‍क करण्‍याच्‍या सुविधेसह उत्‍पादकता वाढवण्‍यात आली आहे. वैशिष्‍ट्ये जसे रिमेम्‍बर धीस आणि रिकॉल स्‍मार्ट मेमरी वॉल्‍टप्रमाणे काम करतात, तर परप्‍लेक्सिटी इंटीग्रेशन त्‍वरित शोध, नियोजन आणि संदर्भीय शिफारशी देते. मोटो एआय, को-पायलट, परप्‍लेक्सिटी व गुगल जेमिनी यामधून निवड करण्‍याच्‍या सुविधेसह वापरकर्ते अत्‍यंत वैविध्‍यपूर्ण, सर्वोत्तम सहाय्यतेचा अनुभव घेऊ शकतात.



या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत मोटोरोला इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. टी. एम. नरसिंहन म्‍हणाले, ''मोटोरोला सिग्‍नेचरसह आम्‍ही भारतातील अल्‍ट्रा-प्रीमियम स्‍मार्टफोन्‍ससाठी नवीन मापदंड निर्माण करत आहोत, जो सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांच्‍या पुढे जातो. या लाँचमधून जागतिक दर्जाची नाविन्‍यता, सुधारित डिझाइन आणि दैनंदिन राहणीमान अधिक उत्‍साहवर्धक करणा-या अर्थपूर्ण अनुभवांना एकत्रित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. डीएक्‍सओएमएआरकेद्वारे सुवर्ण मानकांसह प्रमाणित करण्‍यात आलेले उल्‍लेखनीय कॅमेरा तंत्रज्ञान, प्रमुख कार्यक्षमता, पहिल्‍यांदाच भारतातील स्‍मार्टफोन उद्योगामध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आलेले विशेष सिग्‍नेचर क्‍लब प्रीव्हिलेजेस् आणि वेलनेस-केंद्रित परिसंस्थेला एकत्र आणत, तसेच पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच लाँच करत आम्‍ही सर्वांगीण प्रीमियम ऑफरिंग सादर करत आहोत, जी दैनंदिन जीवनशैलीमध्‍ये विशिष्‍टता, कार्यक्षमता व उद्देशाचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.''

Motorola Signature मध्‍ये सिनेमॅटिक साऊंडसह बोस व डॉल्‍बी अॅटमॉस®चा साऊंड आहे. ड्युअल स्टिरिओ स्‍पीकर्स विशाल, सखोल व सुस्‍पष्‍ट ऑडिओ देतात, जो व्हिज्‍युअल्‍सशी जुळून जातो, तर कन्‍टेन्‍ट-अॅडप्टिव्‍ह ट्यूनिंग आणि हाय-रिझॉल्‍यूशन ऑडिओ सर्टिफिकेशन संगीत, चित्रपट, पॉडकास्‍ट्स व गेम्‍सदरम्‍यान संतुलित, सर्वोत्तम व स्‍टुडिओ-दर्जाच्‍या साऊंडची खात्री देतात. 

Motorola Signature मध्‍ये अत्‍यंत सडपातळ डिझाइनसह सर्वोच्‍च प्रमाणित टिकाऊपणा वैशिष्‍ट्ये आहेत, जेथे या डिवाईसने प्रखर एमआयएल-एसटीडी-810एच मिलिटरी-ग्रेड चाचण्‍या पार केल्‍या आहेत. या डिवाईसमध्‍ये अद्वितीय जलरोधक व धूळरोधकसह आयपी68 व आयपी69 सर्टिफिकेशन आहे, ज्‍यामधून 30 मिनिटांसाठी जवळपास 1.5 मीटर खोल ताज्‍या पाण्‍यामध्‍ये देखील फोन उत्तमरित्‍या कार्यरत राहण्‍याची, तसेच धूळ, वाळू आणि उच्‍च दबावाच्‍या पाण्‍यापासून संरक्षणाची खात्री मिळते. हा डिवाईस नकळतपणे 1.5 मीटर उंचीवरून पडल्‍यामुळे होणा-या नुकसानापासून, तसेच शॉक्‍स, व्‍हायब्रेशन्‍स, 30 अंश सेल्सिअस ते 60 अंश सेल्सिअसपर्यंतच्‍या प्रखर तापमान, उच्‍च आर्द्रता व वाळू, धूळ, द्रवपदार्थ, सोलार रॅडिएशन आणि उंचावरील दाबांपासून सुरक्षित राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.या डिवाईसमधील कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस® 2 डिस्‍प्‍ले अधिक संरक्षण देते, जेथे सिग्‍नेचरमध्‍ये प्रीमियम डिझाइनसह तडजोड न करणारा टिकाऊपणा आहे.   

Motorola Signature मध्‍ये दिवसभर फोन कार्यरत राहण्‍यासाठी क्षमतापूर्ण सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी जवळपास 41 तासांपर्यंत वापराची खात्री देते, तसेच अधिक वेळ व्हिडिओ, गेमिंग, सोशल मीडिया व संगीताचा आनंद देते. 90 वॅट टर्बोपॉवर™ वायर्ड व 50 वॅट वायरलेस चार्जिंग स्‍मार्टफोन जलदपणे व सुरक्षितपणे चार्ज होण्‍याची खात्री देते, तसेच रिव्‍हर्स चार्जिंगसह चालता-फि‍रता इतर डिवाईसेस चार्ज करता येते. प्रगत बॅटरी तंत्रज्ञान व स्‍मार्ट पॉवर मॅनेजमेंट फोनच्‍या अत्‍यंत सडपातळ डिझाइनबाबत तडजोड न करता विश्वसनीय, कार्यक्षम परफॉर्मन्‍स देतात. 

Motorola Signature अँडॉइड 16 वर आधारित हेलिओ यूआयवर संचालित आहे, जेथे 7 खात्रीदायी ओएस अपग्रेड्स आणि 7 वर्षांचे सिक्‍युरिटी मेन्‍टेनन्‍स रीलीजेज (एसएमआर) मिळतात, ज्‍यासह सुरक्षित व भविष्‍याकरिता सुसज्‍ज अनुभव मिळतो. या डिवाईसमध्‍ये व्‍यवसाय श्रेणीच्‍या संरक्षणासाठी मोटो सेक्‍युअर 5.0 सह थिंकशील्‍ड, इतरांसाठी अॅप उपलब्‍धता व वापराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी फॅमिली स्‍पेसेस आणि वापरकर्त्‍यांना डिजिटल व्‍यत्‍यय न येण्‍याची खात्री देण्‍यासाठी मोटो अनप्‍लग आहे. सॉफ्टवेअरला पूरक इको-फ्रेण्‍डली पॅकेजिंग व मोटो एलाइटकेअर आहे, ज्‍यामधून प्रीमियम सपोर्ट मिळतो, तसेच दुरूस्‍तीदरम्‍यान मोफत स्‍टॅण्‍डबाय डिवाईसेस, मोफत पिकअप व ड्रॉप, समर्पित सिग्‍नेचर बडी आणि 24x7 व्‍हॉट्सअॅप असिस्टण्‍ट आहे, ज्‍यासह विनासायास व उत्‍साहवर्धक मालकीहक्‍क अनुभवाची खात्री मिळते.

सिग्‍नेचर अनुभव आणि एकूण मोटोरोला परिसंस्‍थेला उत्‍साहवर्धक करत मोटोरोलाने पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच देखील लाँच केला आहे, ज्‍यासह तंत्रज्ञान, वेलनेस व जीवनशैलीचे संयोजन असलेली एकीकृत प्रीमियम परिसंस्‍था वितरित करण्‍याचा आपला दृष्टिकोन अधिक प्रबळ केला आहे.  

पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच क्‍लासिक घड्याळाप्रमाणे दिसण्‍यासाठी व अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो आरोग्‍याबाबत प्रगत, विज्ञान-आधारित माहिती देतो. या वॉचमध्‍ये कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास 3 चे संरक्षण असलेली विभागातील एकमेव अॅल्‍युमिनिमयम डिझाइन आहे आणि हा वॉच स्‍टेनलेस स्‍टील, वेगन लेदर आणि सिलिकॉन स्‍ट्रॅप्‍ससह उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे दैनंदिन परिधान करण्‍यासाठी आणि औपचारिक प्रसंगांसाठी विविधता मिळते. पोलारच्‍या जागतिक स्‍तरावरील विश्वसनीय वेलनेस प्‍लॅटफॉर्मद्वारे समर्थित हा वॉच आरोग्‍य व फिटनेसवर अचूक ट्रॅकिंग ठेवण्‍यासाठी स्‍मार्ट वर्कआऊट ट्रॅकिंग, नाइटली एएनएस रिचार्ज इनसाइट्स, प्रगत स्‍लीप ट्रॅकिंग, ऑल्‍वेज ऑन एसपीओ2 व हार्ट रेट मॉनिटरिंग आणि ड्युअल-बँड जीपीएस अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह येतो.

जवळपास 13 दिवस कार्यरत राहणारी बॅटरी, 7 दिवसांपर्यंत ऑल्‍वेज-ऑन डिस्‍प्‍ले आणि फक्‍त 5 मिमिनटांच्‍या चार्जिंगमध्‍ये संपूर्ण दिवस कार्यरत राहण्‍याची क्षमता यांसह मोटो वॉच विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमतेची खात्री देतो. या वॉचमध्‍ये 1.4 इंच वर्तुळाकार ओएलईडी डिस्‍प्‍ले, 24 हून अधिक ऑल्‍वेज-ऑन डिस्‍प्‍ले डिझाइन्‍स आणि आयपी68 + 1एटीएम वॉटर रेसिस्‍टण्‍स आहे, ज्‍यामुळे हा वॉच सक्रिय व दैनंदिन जीवनशैलींसाठी अनुकूल आहे. 

उपलब्‍धता: 

मोटोरोला सिग्‍नेचर 12GB RAM + 256GB, 16GM RAM + 512GB व 16GB RAM + 1TB स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल, तसेच दोन आकर्षक पॅन्‍टोन™ निर्मित रंग - पॅन्‍टोन मार्टिनी ऑलिव्‍ह व पॅन्‍टोन कार्बनमध्‍ये येईल. सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्‍युमिनिअम फ्रेमवर डिझाइन करण्‍यात आलेले सुधारित, टेक्‍स्‍टाइल-प्रेरित प्रीमियम फिनिश आहे, ज्‍यामधून ग्रिप व आकर्षकतेची खात्री मिळते. 

या स्‍मार्टफोनच्‍या विक्रीला संपूर्ण भारतात 30th January 2026 रोजी फ्लिपकार्ट, Motorola.in, आणि आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये सुरूवात होईल. या स्‍मार्टफोनची प्रभावी लाँच किंमत INR 54,999* पासून सुरू होते.  



लाँच किंमत:        

12GB + 256GB                 : Rs. 59,999 

16GB + 512GB : Rs. 64,999 

16GB + 1TB      :                     Rs. 69,999 

किफायतशीर ऑफर: 

ग्राहक खाली देण्‍यात आलेल्‍या 2 पैकी 1 ऑफरचा आनंद घेऊ शकतो 

1. बँक ऑफर – एचडीएफसी व अॅक्सिस बँकच्‍या माध्‍यमातून Rs. 5000 त्‍वरित बँक सूट 

2. जवळपास Rs 5,000 एक्‍स्‍चेंज बोनस (निवडक मॉडेल्‍ससाठी, एक्‍स्‍चेंज बोनस जवळपास Rs 7,500 आहे) 

प्रभावी किमतीसह ऑफर: 

12GB + 256GB : Rs. 54,999*

16GB + 512GB : Rs. 59,999*

16GB + 1TB            : Rs. 64,999*

ऑपरेटर ऑफर: 

जिओ प्रीपेड प्‍लॅन Rs. 1199 सह रिचार्जवर Rs. 15,000 किमतीचे 6 महिन्‍यांसाठी 10 प्रीमियम ओटीटी अॅप्‍स मोफत उपलब्‍ध.

अधिक माहितीसाठी - https://www.jio.com/offers/brand-partners/jio-motorola-signature-offer-2026/  

अतिरिक्‍त ऑफर्स:  

1. 6 महिन्‍यांसाठी मोफत परप्‍लेक्सिटी प्रो सबस्क्रिप्‍शन मिळवा. 

2. कोणत्‍याही बीस्‍पोक प्रीव्हिलेज अनुभवावर मोटोरोला सिग्‍नेचर क्‍लब अॅपच्‍या माध्‍यमातून जवळपास Rs 6000 किमतीच्‍या वेलकम बेनीफिट्सचा आनंद घ्‍या. 

बंडल ऑफर्स:

मोटोरोला सिग्‍नेचरसह मोटो-वॉचच्‍या खरेदीवर फ्लॅट Rs. 5,000 सूट. 

ऑफर फक्‍त 10 फेब्रुवारीपर्यंत वैध आहे.

motorola signature च्‍या खरेदीवर या ऑफरचा आनंद घेऊ इच्छिणारे ग्राहक व्‍हॉट्सअॅपवरील मोटोरोला सपोर्ट (80679 16686) वर 'Hi' पाठवू शकतात आणि स्‍वत:चा तपशील प्रविष्‍ट करत उल्‍लेख करण्‍यात आलेले डिस्‍काऊंट कूपन निर्माण करू शकतात. 

To know more about the product visit:  

Flipkart - https://www.flipkart.com/motorola-signature-pantone-martini-olive-256-gb/p/itm945fffeb4a94c?pid=MOBHGVJYTCM8BZQF

https://www.flipkart.com/motorola-signature-coming-soon-store

Motorola website - https://www.motorola.in/smartphones-motorola-signature/p?skuId=616 

Disclaimers:

^All battery life claims are approximate and based on the median user tested across a mixed use profile (which includes both usage and standby time) under optimal network conditions. Actual battery performance will vary and depends on many factors including signal strength, network and device settings, temperature, battery condition, and usage patterns.

*Price including all offers

# As Per TechArc India’s Leading AI Smartphone Brand Report 2025

^https://www.dxomark.com/motorola-signature-camera-test/

^^ *Welcome Offer valid till 31 March. Offer applicable on the first Signature Club service only, with benefits of up to INR 6,000. If the service cost exceeds INR 6,000, the additional amount shall be borne by the user. If the service cost is below INR 6,000, the complimentary benefit will be considered fully utilised and cannot be carried forward or reused. Dining and shopping services are excluded from this offer. Offer subject to availability and other terms and conditions.

Detailed Specifications: Motorola Signature

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.