Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय "सहवास"*

*मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय "सहवास"*


*दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्या "सहवास" चित्रपटाचे दमदार पहिले पोस्टर प्रदर्शित*



मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि प्रेमकथेचा अनोखा संगम सादर करणारा नवा चित्रपट “सहवास” याचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे , सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित या चित्रपटाने पोस्टरच्या माध्यमातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि थरार निर्माण केला आहे.


पोस्टरमध्ये एका पुरुषाच्या खांद्यावर ठेवलेला अदृश्य हात आणि गूढ, अंधुक वातावरण चित्रपटाच्या कथेतील रहस्य अधोरेखित करते. “प्रेम का भीती?” हा सवाल उपस्थित करत, “सहवास” ही केवळ प्रेमकथा नसून, प्रेमाच्या नावाखाली उलगडणाऱ्या भयावह सहवासाची कथा असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात.


“सहवास” या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे करणार असून, निर्मितीची धुरा गोवर्धन दोलताडे हे सांभाळणार आहेत . सहनिर्माते म्हणून कार्तिक दोलताडे पाटील यांचे योगदान आहे. मराठी सिनेमात फारसा न पाहिलेल्या हॉरर-रोमँटिक शैलीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे.


चित्रपटाच्या शीर्षकातील “सहवास” हा शब्द प्रेम, जवळीक आणि नातेसंबंध सूचित करतो , मात्र पोस्टरमधील भयगूढ संकेत या सहवासामागील अंधार उघड करतात. त्यामुळे हा सहवास प्रेमाचा आहे की भीतीचा, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.


“सहवास” प्रेम का भीती?

हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घोळवत, चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार असणार आहेत

असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.