Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नव्या वर्षात स्टार प्रवाहवर मनोरंजनाची महापर्वणी तीन नवे कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 नव्या वर्षात स्टार प्रवाहवर मनोरंजनाची महापर्वणी

तीन नवे कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 


स्टार प्रवाहच्या सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. नव्या वर्षातही मनोरंजनाचा महापर्वणी घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. मी सावित्रीबाई जोतीराव फुले आणि तुझ्या सोबतीने या दोन नव्या मालिका आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं चौथं पर्व नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर जिवंत होणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयप्रेरणादायी आणि क्रांतिकारी जीवनावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही भव्य मालिका ५ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. साधारणतः दीडशे वर्षांपूर्वीमहिलांना चूल आणि मूल या मर्यादांमध्ये अडकवून ठेवणाऱ्या समाजव्यवस्थेविरोधात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी ठामपणे एल्गार पुकारला. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावास्त्रीला विचार करण्याचं आणि स्वतःचं अस्तित्व घडवण्याचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी या क्रांतिकारी दाम्पत्याने अपार संघर्ष केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतघरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष सहन करत त्यांनी शिक्षणाची दारं खुली केली. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या या विचारवंतांचा जीवनप्रवास मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ही मालिका आवर्जून पाहायला हवी.



मी सावित्रीबाई जोतीराव फुले या ऐतिहासिक मालिकेसोबतच तुझ्या सोबतीने ही नवी मालिका देखिल स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय. एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारीकुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारी नुपूर. तिच्या मते सगळेच परिपूर्ण नसतात. जग इमपरफेक्शनच्या तत्वांवर चालतं. तर दुसरीकडे ग्लॅमरलाईट्स आणि परफेक्शनच्या जगातला सुमती इव्हेंट्सचा मालक मल्हार खानविलकर. नुपूर आणि मल्हारचं जग जरी वेगळं असलं एकमेकांच्या साथीने ते प्रवास कसा करतात याची गोष्ट म्हणजे तुझ्या सोबतीने ही मालिका. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे ही नवी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १२ जानेवारीपासून रात्री ९ वाजता या नव्या पात्रांना भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.



स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांचं भरभरुन मिळालं. या तिन्ही पर्वातले स्पर्धक आपल्या टॅलेण्टने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. मालिकेचं शीर्षकगीत असो वा सिनेमातलं गाणं प्रत्येक स्पर्धकाला स्टार प्रवाहच्या माध्यमातून आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. मी होणार सुपरस्टारचा मंच ही केवळ स्पर्धा नसून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे. स्पर्धकांवर सुरांचे संस्कार करण्यासाठी मी होणार सुपरस्टारचा चौथा सीजन सज्ज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. या पर्वातही जजच्या भूमिकेत दिसतील सुप्रसिद्ध अभिनेतेदिग्दर्शकनिर्माते आणि गायक सचिन पिळगांवकरलोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे. नवोदित अभिनेत्री साजिरी जोशी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे. साजिरी नुकतीच एका सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. हाच गोडवा घेऊन ती छोट्या उस्तादांसोबत धमाल करणार आहे. ३ जानेवारी पासून रात्री ९ वाजता सुरांची ही मैफल अनुभवता येणार आहे. तेव्हा नव्या वर्षात मनोरंजनाचा हा महाधमाका अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.