Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अभि - क्रितिकाचे केळवण झाले दणक्यात ‘लग्नाचा शॉट’चा टिझर प्रदर्शित*

 *कौटुंबिक मनोरंजनाचा 'शॉट' तयार !*


*अभि - क्रितिकाचे केळवण झाले दणक्यात  ‘लग्नाचा शॉट’चा टिझर प्रदर्शित*

लग्न म्हणजे आनंद, गोंधळ, परंपरा आणि थोडीशी धावपळ… परंतु या सगळ्यावर जर अचानक ‘शॉट’ बसला तर? हाच प्रश्न उद्भवणाऱ्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, लग्नघरातील उत्साह, धमाल आणि पारंपरिक विधींनी नटलेल्या या सोहळ्यात चित्रपटातील नवरा -नवरी अर्थात अभि आणि क्रितिका म्हणजेच अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी उखाणेही घेतले. या रंगतदार सोहळ्यात भर टाकली ती, चित्रपटाच्या टीझरने. 'लग्नाचा शॉट'ची पहिलीच झलक उपस्थितांना प्रचंड भावल्याचे दिसतेय. 



पोस्टरमधून सूचित झालेल्या गोंधळाचा टिझरमध्ये मजेशीर विस्तार पाहायला मिळतो. लग्नाची धावपळ, चुकीचे निर्णय, वेळेचा गोंधळ, नशिबाचे फेरे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार प्रसंगांची झलक टिझरमध्ये दिसते. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच टिझरमध्येही ‘शॉट’ म्हणजेच अचानक घडणाऱ्या घटना, वळणावळणाचा प्रवास आणि लग्नात उडणारा गोंधळ यांचा धमाल मेळ आहे.


विशेष म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांची केमिस्ट्री टिझरमध्ये खूपच फ्रेश आणि सहज वाटते. त्यांच्या संवादांमधील टायमिंग, हावभाव आणि एकमेकांशी असलेली जुगलबंदी पाहाता ही जोडी प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहाणार आहे. टिझरमधून हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहाता येईल, असा स्वच्छ, हलकाफुलका आणि मनोरंजक अनुभव देणारा असल्याचं स्पष्ट होतंय.


चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, '' 'लग्नाचा शॉट' हा लग्नाकडे केवळ समारंभ म्हणून न पाहाता, त्यातील गोंधळ, भावना आणि विनोद यांचं मजेशीर चित्रण करणारा चित्रपट आहे. अभिजीत आणि प्रियदर्शिनी यांची केमिस्ट्री खूप नैसर्गिक आहे आणि त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतला आहे. कोणताही उपदेश न करता, प्रेक्षकांनी दोन तास मनसोक्त हसावं, एन्जॉय करावं आणि आपल्या लग्नघरातील आठवणींशी जोडून घ्यावं, एवढाच आमचा प्रयत्न आहे. हा चित्रपट म्हणजे स्वच्छ, प्रामाणिक आणि कौटुंबिक मनोरंजनाचा शॉट आहे.''



महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.