यशराज फिल्म्सकडून राणी मुखर्जी स्टारर ‘मर्दानी 3’ची रिलीज डेट समोर; 30 जानेवारीला होणार प्रदर्शित, पहिला पोस्टर रिलीज – बेपत्ता मुलींना वाचवण्यासाठी वेळेशी शर्यत.
यश राज फिल्म्सची मर्दानी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी सोलो महिला-प्रधान फ्रँचायझी असून गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रशंसा मिळवत आहे. या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीने सिनेप्रेमींमध्ये कल्ट स्टेटस मिळवले आहे. भारतातील एकमेव आणि सर्वात मोठी महिला पोलिस अधिकारी केंद्रस्थानी असलेली फ्रँचायझी मर्दानी आता तिसऱ्या भागात पोहोचली असून मर्दानी 3 मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा धाडसी पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्या न्यायासाठी निस्वार्थपणे लढा देतात.
आज यश राज फिल्म्स (YRF) ने मर्दानी 3 ची रिलीज डेट पुढे आणत हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. निर्माते या चित्रपटात शिवानीच्या चांगुलपणाचा आणि भयावह वाईट शक्तींचा रक्तरंजित व हिंसक संघर्ष दाखवणार असून, देशातील अनेक बेपत्ता मुलींना वाचवण्यासाठी ती वेळेशी शर्यत लढताना दिसणार आहे.
मर्दानी 3 च्या पहिल्या पोस्टरची लिंक येथे पाहा: https://www.instagram.com/p/DTU_2MeiFS4/?igsh=YWpsaXRwbGE3M2U4
याआधीच राणी मुखर्जी यांनी हा एज-ऑफ-द-सीट थ्रिलर ‘डार्क, डेडली आणि ब्रूटल’ असणार असल्याचे सांगितले होते, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये, चाहत्यांमध्ये आणि फ्रँचायझीच्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
मर्दानी 3 चे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. मर्दानी (पहिला भाग) मध्ये मानव तस्करीच्या भयावह वास्तवावर प्रकाश टाकण्यात आला होता, तर मर्दानी 2 मध्ये व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका मानसिक विकृत सिरीयल रेपिस्टचे भयानक मनोविश्व उलगडण्यात आले होते. मर्दानी 3 समाजातील आणखी एका अंधाऱ्या आणि क्रूर वास्तवात डोकावणार असून, दमदार आणि मुद्देसूद कथाकथनाची फ्रँचायझीची परंपरा पुढे नेणार आहे.
