Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न ! सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित !!

 श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न !  सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित !!


शुभारंभाच्या मंगल क्षणी, श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट पार पडला. या प्रसंगाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणी घेऊन ‘मर्दिनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रे‌यस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत या चित्रपटाची कथा मनोरंजनाच्या पलीकडे, प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि शक्तीची गाथा उलगडते.


प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनी असते…वेळ आली की रूप दाखवते…



या चित्रपटात सुंदर आणि चमकदार कलाकारांचा संगम आहे, ज्यांच्या कामगिरीमुळे कथा अधिक प्रभावी आणि आठवणींमध्ये राहणारी बनेल. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या दमदार कलाकारांसह बालकलाकार मायरा वैकुळची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’ हा चित्रपट आशय, अभिनय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने एक वेगळा आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देईल.  


दिग्दर्शक अजय मयेकर यांचे या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. तर दीप्ती तळपदे ह्या निर्मात्या आहेत. ‘मर्दिनी’ चित्रपट येत्या २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.