*मेगा अनाउन्समेंट ! बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंह दिस णार "माना के हम यार नहीं" च्या एक तास विशेष भागात!*
मालिका विश्वात आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस ! स्टार प्लसने कायम प्रभावी आणि मनमोहक कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवून त्यांचं निखळ मनोरंजन केलं आहे. प्रेक्षकांना मोहित करून वैविध्यपूर्ण मालिका देणार हे चॅनल लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं देखील कळतंय. मालिका विश्वात नेहमीच चर्चेत असलेल्या स्टार प्लस वर च्या मालिकांच्या यादीत आणखी एक नवं नाव जोडत ‘माना के हम यार नहीं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जबरदस्त स्टारकास्ट आणि भावनिक करार विवाहाच्या कथेला उजाळा देणारी ही मालिका असणार आहे. या मालिकेत मंजित मक्कड कृष्णाच्या भूमिकेत आणि दिव्या पाटील खुशीच्या भूमिकेत मुख्य कलाकार म्हणून झळकणार आहेत. कथानक जसजसे पुढे सरकते आहे तसतसा या मालिकेतील ‘पारिवार स्पेशल एपिसोड’ आणखी रोमांचक ठरणार असल्याचं बघायला मिळणार आहे.
खुशी आणि कृष्णाचे लग्न होत आहे आणि ते दोघे लग्नसोहळा साजरा करत असताना बॉलिवूडचा बडा गायक मिका सिंह आणि स्टार परिवारातील इतर सदस्य या मालिकेत बघायला मिळणार आहेत. खुशी आणि कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात टोकाचा फरक असला तरी आता ते विवाहबंधनात अडकले आहेत आणि त्यामुळे हा सोहळा आणखी भव्य आणि मनोरंजक होणार यात शंका नाही.
स्टार प्लसने नेहमीच प्रेक्षकांना आपलंसं करून दर्जेदार अस त्यांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा उत्तम कथा कायम प्रेक्षकांना स्क्रीनला खिळवून ठेवतात आणि हा लग्नसोहळा त्याला अपवाद नाही. नवीन प्रोमो रिलीज झाल्यानंतर यातून दिसून येतंय की या लग्नाबद्दल सर्वजण उत्साहित आहेत जरी खुशी आणि कृष्णाच्या विरुद्ध स्वभावामुळे त्यांच्या एकत्र येण्याबद्दल थोडीशी शंका असली तरी आता दोघांचे लग्न झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हा प्रवास कसा उलगडतो, हे पाहणे अधिक रंजक ठरणार आहे. विशेषतः सध्या सुरू असलेल्या वेडिंग सीजनमध्ये हा भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
'माना के हम यार नहीं' या मालिकेतील हा 1 तासांचा पारिवार स्पेशल एपिसोड 25 आणि 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:30 ते 7:30 फक्त स्टार प्लसवर बघायला विसरू नका.
