*१०१ वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन*
अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेतर्फे मार्च २०२६ साली संपन्न होणाऱ्या नियोजित ‘१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलना’च्या अध्यक्षपदासाठी घटनेच्या कलमानुसार परिषदेच्या सभासदांकडून नावे मागविण्यात येत आहेत. सदस्यांनी आपले सूचना पत्र सुचित व्यक्तीच्या लेखी संमतीसह आणि सूचक व अनुमोदक यांच्या स्वाक्षरीसह परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय संकुल, मनमाला टँक रोड, माहिम, मुंबई ४०० ०१६ येथील कार्यालयात सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ७.०० वाजेपर्यंत सीलबंद लखोटयात सादर करावे. त्यानंतर आलेल्या सूचना पत्रांचा विचार केला जाणार नाही. सूचक, अनुमोदक व सूचित व्यक्ती या नियामक मंडळाचा सदस्य असता कामा नयेत. मात्र ते परिषदेचे आजीव सदस्य असले पाहिजेत, तसेच संमेलना’च्या अध्यक्षपदासाठी सुचवलेली व्यक्ती परिषदेचे किमान दोन वर्षे आजीव सदस्य असले पाहिजेत, ह्याची दक्षता सभासदांनी सूचना पत्र पाठविताना घ्यावी.