*’आफ्टर ओएलसी’ मधील लय लय लय या गाण्याच्या लोकेशन्सची चर्चा, शूटने वेधलं लक्ष*
*शूट लोकेशन्स असावीत तर अशी…‘आफ्टर ओएलसी’मधील ‘लय लय लय’ रोमँटिक साँगने दाखविली झलक*
‘आफ्टर ओएलसी’ या चित्रपटातील पहिलं रोमँटिक सॉंग सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि अर्थात या गाण्याच्या शूट लोकेशन्सने सर्वांच्या नजरा वळविल्या आहेत. ‘लय लय लय’ असे या गाण्याचे नाव असून निसर्गाच्या सानिध्यात शूट झालेलं हे गाणं अर्थात गाण्याची उंची वाढवतंय. उंच उंच धबधबे, डोंगर रांगा आणि आजूबाजूची हिरवळ हे सारं काही या गाण्यातून नजरेत भरतंय. सिनेमॅटोग्राफर आर.डी. नागार्जुन यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हे सुंदर लोकेशन्स कैद केले आहेत.
तर ‘लय लय लय’ गाण्यात साऊथ सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते कवीश शेट्टी आणि अभिनेत्री मेघा शेट्टी यांनी अभिनय करत चारचाँद लावले आहेत. हा चित्रपट ॲक्शन पॅक्ड असला तरी चित्रपटातील या गाण्यातील रोमँटिक बाजूही प्रेक्षकांसमोर आली आहे. आणि त्यामुळेच चित्रपटाबाबत आणखीनच उत्सुकता साऱ्यांच्या मनात लागून राहिली आहे. या गाण्याला गायिका वैशाली सामंत हिने तिच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. गाण्याच्या संगीताची जबाबदारी प्रांशू झा यांनी सांभाळली आहे. तर गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहेत.
कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदाकारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केलाय. या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. येत्या 28 नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटातील हे रोमँटिक सॉंग v Naad Music या युट्यूब चॅनेलवर धुमाकूळ घालत आहे.

