Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वानंदी–समर आणि आधिरा–रोहन यांनी बाप्पाच्या चरणी ठेवली लग्नपत्रिका

*स्वानंदी–समर आणि आधिरा–रोहन यांनी बाप्पाच्या चरणी ठेवली लग्नपत्रिका*

*झी मराठीच्या नायिकांकडून माजघरात साजरा झाला पारंपरिक केळवण सोहळा!*

*फुलांनी सजलेले माजघर, खास गाणं आणि स्वादिष्ट थाळी*





झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका *‘वीण दोघातली ही तुटेना’* मध्ये महा लग्नसोहळा साजरा होत आहे. मालिकेतील प्रिय जोडपी *स्वानंदी–समर* आणि *आधिरा–रोहन* यांच्या महाविवाह सोहळ्याची सुरुवात झाली असून, हा प्रसंग संपूर्ण सरपोतदार आणि राजवाडे कुटुंबाला एकत्र आणणार आहे. या विशेष प्रसंगी वधू–वरांनी प्रथम गणपती मंदिराला भेट देत बाप्पा समोर लग्नपत्रिका ठेऊन सर्व निर्विघ्न पार पडुदे अशी प्रार्थना केली. गुलाबपुष्पांच्या वर्षावात या जोडप्यांचे मंदिरात स्वागत करण्यात आले.




मंदिरातून ही दोन जोडपी थेट पोहोचली ती 'माजघरात' त्यांचे स्वागत करण्यासाठी *कमळी, भावना, जान्हवी, मीरा आणि नर्मदा* आत्या त्यांची वाट पाहत होत्या. स्वानंदी–समर आणि आधिरा–रोहन यांच्या केळवण सोहळ्यासाठी या सर्वांनी पारंपरिक पद्धतीने ओवाळून त्यांचे स्वागत केले. या जोडप्यांसाठी तयार करण्यात आलेले एक सुंदर गाणं या ठिकाणी सादर करण्यात आले, ज्याने वातावरण अधिक आनंदमय झाले.




राजवाडे आणि सरपोतदार  कुटुंबातील सर्व सदस्य या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. सर्वांना प्रतीक्षा होती ती महाराष्ट्रीयन थाळीची! स्वादिष्ट डाळिंबी उसळ, कोथिंबीर वडी, सोलकढी आणि इतर रुचकर पदार्थांनी सजलेली थाळी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. वधू–वरांनी एकमेकांना घास भरवून उखाणे घेतले. 

 



*या प्रसंगी कलाकारांनी सांगितले की* , “हा महाविवाह सोहळा आमच्यासाठी खूप खास आहे. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर मालिकेतील दोन्ही जोडप्यांचे लग्न होताना पाहून आम्हालाही आनंद वाटत आहे. केळवणासाठी आम्ही आमचे संध्याकाळचे स्नॅक्स स्किप केलं, कारण ‘माजघर’ बद्दल खूप ऐकल होत आणि तिथे आमचे केळवण असल्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली होती. संध्याकाळी जेवण खरोखरच अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर अनुभव देणारे ठरल. प्रत्येक पदार्थ अतिशय स्वादिष्ट होता, फुलांनी सजवलेला व्हेन्यू , आणि केळीच्या पानावर लिहिलेली आमची नाव पाहून आम्हाला खूप विशेष वाटले. सर्वात मोठा सरप्राईज म्हणजे आमच्यासाठी खास तयार केलेले गाणं. प्रेक्षकांनी ‘वीण  दोघातली ही  तुटेना’ या मालिकेवर असच प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवावा, हीच आमची इच्छा आहे.”




प्रेक्षकांसाठी हा महाविवाह सोहळा एक पर्वणी ठरणार आहे. त्याचसोबत मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच डेस्टिनेशन बीच वेडिंग पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे.  *तेव्हा बघायला विसरू नका ‘वीण  दोघातली ही  तुटेना’ अविस्मरणीय अनुभव देणारा महाविवाह सोहळा दररोज संध्या. ७:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.