Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सायली संजीव व शशांक केतकरचा पहिलाच रोमॅंटिक अंदाज ‘नारळी पोफळीच्या बागा’मध्ये खुलला

 *सायली संजीव व शशांक केतकरचा पहिलाच रोमॅंटिक अंदाज ‘नारळी पोफळीच्या बागा’मध्ये खुलला*



https://www.youtube.com/watch?v=uc_1rs8b2Sc&list=RDuc_1rs8b2Sc&start_radio=1


*’कैरी’ चित्रपटातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ गाण्यात सायली–शशांकची रोमॅंटिक केमिस्ट्री, निसर्गरम्य, सुंदर कोकणात झालंय शूट*



उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार म्हणून तुम्ही खुश आहात ना?, हो. आता तुम्हाला कळालंच असेल मराठी कलाकारांची मांदियाळी असलेला ‘कैरी’ हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होतोय आणि याची उत्सुकता तुम्हालाही लागून राहिली असेलच. बरं आता या उत्सुकतेत भर घालायला ‘कैरी’ सिनेमातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ हे नवकोर रोमँटिक सॉंग साऱ्या रसिकांच्या मनावर राज्य करतंय. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलंय. कारण कोकणातील वातावरणात शूट झालेल हे गाणं सध्या आपल्यालाही कोकणची आठवण करून देताना दिसत आहे.


या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे या गाण्यात मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे दुसऱ्यांदा मोठ्या स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर ही जोडी ‘कैरी’ या सिनेमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. तर कैरी' या चित्रपटात अभिनेते सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे दिग्गज कलाकारही मुख्य भूमिकेत असल्याचे दिसतंय. ‘नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात शशांक आणि सायली यांची रोमँटिक केमिस्ट्री विशेष भावतेय. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेलं हे जोडपं ते त्यांच्या संसाराची सुरुवात इथवरचा त्यांचा रोमँटिक प्रवास ‘नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात पाहायला मिळत आहे.



नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी’ हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ या रोमँटिक सॉंगने चित्रपटाची उंची आणि उत्सुकता वाढवली आहे. या गाण्याचे गीत मनोहर गोलांबरे यांचे असून संगीताची जबाबदारी निषाद गोलांबरे यांनी सांभाळली आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात शूट झालेलं ‘नारळी पोफळीच्या बागा’ हे गाणं आणि सायली-शशांकचा रोमँटिक अभिनय साऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.