Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मायाच्या जाळ्यात अडकली मीरा, तिला वाचवण्यासाठी अथर्वची धावपळ!

*मायाच्या जाळ्यात अडकली मीरा, तिला वाचवण्यासाठी अथर्वची धावपळ!*

*गुंडांच्या तावडीत मीरा !*




प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या *'तुला जपणार आहे'* मालिकेच्या कथानकात उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. अथर्व आणि मीराच्या आयुष्यात हळूहळू प्रेमाचं नातं उमलतंय. प्रत्येक प्रसंगातून त्यांच्यातील नातं अधिक दृढ होताना दिसतंय. तर दुसरीकडे अनन्या आणि दादासाहेब सतत अथर्वची फिरकी घेतायत. मीराच्या साधेपणात, मीराचा प्रेमळ स्वभाव आणि वेदासोबतच्या गोड क्षणांमध्ये अथर्व ओढला जातोय. सुरुवातीला अथर्व हे मान्य करत नसला तरी, तरी प्रत्येक छोट्या क्षणात मीराचं अस्तित्व त्याच्यासाठी खास ठरतं. फाउंटनमधला पावसासारखा प्रसंग, तिच्या आवडत्या रंगाचे कपडे, आवडीचा पदार्थ या सगळ्या गोष्टींनी अथर्वच्या मनातलं प्रेम नकळत फुलतं जातंय . 

 


दरम्यान, माया मीराविषयी इर्षेने ग्रासलेली असून ती मीरा विरोधात कट रचतेय. खोटं सांगून ती मीराला गावाकडे पाठवते आणि त्याचवेळी तिच्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणते. परिस्थिती अत्यंत बिकट होते, जेव्हा मीरा अथर्वला मदतीसाठी फोन करते आणि फक्त "वाचवा" एवढंच बोलते. अथर्व तिचं ठिकाण कळताच, अथर्व तिच्या मदतीला धावून जात असताना त्याला अनन्याचे शब्द आठवतात, आणि त्या धुंदीत तो स्पीडने गाडी चालवतो."



*अथर्व गाडी वेगाने चालवत असतानाच गाडीचा अपघात होतो. आता मीराला तो गुंडान पासून वाचवू शकेल का? आणि मीरा समोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करेल? यासाठी बघायला विसरू नका 'तुला जपणार आहे' दररोज रात्री १०:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.