*घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या नात्यात येणार मकरंद नावाचं वादळ*
*सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकरची होणार धमाकेदार एण्ट्री*
स्टार प्रवाहची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेची गोष्ट १२ वर्ष मागे गेली असून ऋषिकेश जानकीच्या प्रेमाची गोष्ट आणि त्यांच्या प्रेमात अडथळे आणू पहाणारा मकरंद असा रंजक प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मकरंदचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. मनोमनी जानकीला तो आपली पत्नी मानतो. सहसा तो कुणाला दुखावत नाही मात्र त्याला कुणी दुखावलंच तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. संकोची वृत्तीचा असलेला मकरंद जानकी-ऋषिकेशच्या नात्यातला सर्वात मोठा अडथळा असणार आहे. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा प्रत्येक भाग म्हणजे नवा खुलासा करणारा ठरणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर मकरंद ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना कश्यप म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अगदी मन उधाण वाऱ्याचे मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेत मकरंद ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे. अतिशय हुशार आणि स्वकतृत्वावर विश्वास असणाऱ्या मकरंदचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. जानकीचं प्रेम मिळवण्यासाठी तो काय काय करतो हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. मालिकेची संपूर्ण टीम खूपच छान आहे. सगळ्यांनीच मला या परिवारात सामील करुन घेतलं. मराठी टेलिमव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घरोघरी मातीच्या चुली मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे जाणार आहे. तेव्हा हा रंजक प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

