इंडियन पॅनोरमा--2025 ची अधिकृत निवड आणि 56 व्या इफ्फी, 2025 साठी सर्वोत्कृष्ट वेब-सिरीज (ओटीटी) पुरस्कार-2025 साठी नामांकन
भारतीय चित्रपटांसाठीच्या 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कारासाठी 25 चित्रपट (मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील 5 चित्रपटांसह) आणि 5 चित्रपटांना नामांकन
56 व्या इफ्फीमध्ये 20 नॉन-फीचर चित्रपट प्रदर्शित केले जातील आणि सर्वोत्तम वेब-सिरीज (ओटीटी) पुरस्कार-2025 साठी 5 सर्वोत्कृष्ट वेब सिरीजना नामांकन
‘आमरण (तमिळ)’ या चित्रपटाने इंडियन पॅनोरमा 2025 चे उद्घाटन होईल, आणि ‘काकोरी (हिंदी)’ हा इंडियन पॅनोरमा 2025 चा उद्घाटनपर नॉन-फीचर चित्रपट असेल
News By. ------- Dilip R Yadav
---------------------------------------------
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) चा प्रमुख घटक असलेल्या इंडियन पॅनोरमाने 2025 वर्षासाठी भारतीय चित्रपटांसाठीच्या 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कारासाठी 25 फीचर फिल्म्स (मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील 5 चित्रपटांसह) आणि 5 चित्रपटांना तसेच 20 नॉन-फीचर चित्रपटांना नामांकन जाहीर केले आहे. नामांकन झालेले हे चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या 56 व्या इफ्फीमध्ये प्रदर्शित केले जातील.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने आयोजित केलेल्या इंडियन पॅनोरमाचे उद्दिष्ट इंडियन पॅनोरमाच्या नियमांनुसार सिनेमॅटिक, थीमॅटिक आणि सौंदर्यात्मकदृष्ट्या उत्कृष्ट असलेल्या फिचर आणि नॉन-फीचर चित्रपटांची निवड करणे आहे.
इंडियन पॅनोरमाची निवड भारतातील चित्रपट जगतातील नामांकित व्यक्तींकडून केली जाते, ज्यामध्ये फिचर फिल्मसाठी एकूण बारा ज्युरी सदस्य आणि नॉन-फिचर फिल्मसाठी सहा ज्युरी सदस्य असतात. त्यांच्या वैयक्तिक कौशल्याचा वापर करून, प्रख्यात ज्युरी पॅनेल संबंधित श्रेणीतील इंडियन पॅनोरमा चित्रपटांची निवड करताना एकमत होण्यासाठी समान योगदान देतात.
बारा सदस्यांचा समावेश असलेल्या फिचर फिल्म ज्युरीचे नेतृत्व प्रख्यात अभिनेते, चित्रपट निर्माते आणि निर्माते, अध्यक्ष राजा बुंदेला यांनी केले. फिचर फिल्म ज्युरीमध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे, जे वैयक्तिकरित्या विविध प्रशंसित चित्रपटांचे प्रतिनिधित्व करतात आणि सुप्रसिद्ध चित्रपट व्यावसायिक आहेत आणि एकत्रितपणे विविध भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व करतात:
1. कृष्णा हेब्बाळे, अभिनेते
2. असीम के. सिन्हा, संकलक आणि चित्रपट निर्माते
3. कमलेश के. मिश्रा, चित्रपट निर्माते आणि लेखक
4. अरुण बक्षी, अभिनेते आणि गायक
5. जादुमनी दत्ता, चित्रपट निर्माते, निर्माता आणि अभिनेते
6. अशोक सरन, निर्माता आणि चित्रपट निर्माते
7. सुभाष सहगल, संकलक, निर्माता, चित्रपट निर्माते आणि लेखक
8. मलय रे, छायालेखक आणि चित्रपट निर्माते
9. प्रा. अमरेश चक्रवर्ती, चित्रपट समीक्षक आणि चित्रपट निर्माते
10. बी. एस. बसवराजू, छायालेखक आणि चित्रपट निर्माते
11. सुकुमार जटानिया, छायालेखक
12. नेपोलियन आर.झेड. थांगा, चित्रपट निर्माते
इंडियन पॅनोरमा - 2025 मध्ये प्रवेशिका म्हणून प्राप्त झालेल्या 516 समकालीन भारतीय चित्रपटांमधून 56 व्या इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शित करण्यासाठी 25 चित्रपटांचे पॅकेज (मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील ५ चित्रपटांसह) आणि भारतीय चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकासाठी 5 चित्रपटांचे नामांकन भारतीय चित्रपट उद्योगाची चैतन्यशीलता आणि विविधता प्रतिबिंबित करते.
इंडियन पॅनोरमा 2025 मध्ये निवड झालेल्या 25 चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे:
चित्रपटाचे शीर्षक. भाषा. दिग्दर्शकाचे नाव
सरकीत
मल्याळम
थामर के.व्ही
आमरण
तमिळ
राजकुमार पेरियासामी
विमुक्त
ब्रज
जितंक सिंग गुर्जर
बंगाल फाइल्स
हिंदी. विवेक रंजन अग्निहोत्री
तन्वी द ग्रेट. हिंदी. अनुपम खेर
वन्य कन्नड. बडीगर देवेंद्र
व्हाईट स्नो उर्दू. प्रवीण मोर्चाले
भैमोन दा. आसामी. ससंका समीर
गोंधळ. मराठी. संतोष डावखर
सु फ्रॉम सो. कन्नड. प्रकाश (जेपी तुमिनाद)
पोक्खिराजेर डीम. बंगाली. सौकार्या घोषाल
इमबु. तुळू शिवध्वज शेट्टी
दृश्य अदृश्य मराठी. पुरुषोत्तम लेले. (मिलिंद लेले)
ओइथरेई. मणिपुरी. नौरेम दिनेश सिंग. बरोबाबू
बंगाल. रेश्मी मित्रा. पिरंथनाल वझथुकल
तामिळ. राजू चंद्र (राजकुमार एमआर). मालीपुत मेलोडीज
ओरिया. विशाल पटनायक
मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. मराठी. परेश मोकाशी
ग्राउंड झिरो
हिंदी
तेजस प्रभा विजय देवस्कर
व्हिस्पर्स ऑफ द माउंटेन्स. राजस्थानी. जिगर नागडा
मुख्य प्रवाहातील चित्रपट विभाग
चित्रपटाचे शीर्षक. भाषा. दिग्दर्शकाचे नाव
आता थांबायचं नाय
मराठी
शिवराज वायचळ
छावा
हिंदी
लक्ष्मण उतेकर
थुदारम मल्याळम
मल्याळम
तरुण मूर्ति
सिकार देबांगकर बोरगोहेन
आसामी
देबांगकर बोरगोहेन
संक्रांतिकी वास्तुनाम
तेलुगु
अनिल रविपुडी
इंडियन पॅनोरमा 2025 च्या उद्घाटनपर फीचर फिल्मसाठी फीचर फिल्म ज्युरीची निवड राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित "आमरण (तमिळ)" हा चित्रपट आहे.
इंडियन पॅनोरमा फीचर ज्युरीने भारतीय फीचर फिल्म पुरस्कार श्रेणीतील पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकित केलेल्या 5 चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे:
अ. क्र. चित्रपटाचे शीर्षक दिग्दर्शकाचे नाव. भाषा
1. शेप ऑफ मोमो
त्रिवेणी राय
नेपाळी
2. बिनोदिनी एकती नातीर उपाख्य
राम कमल मुखर्जी
बंगाली
3. केसरी चॅप्टर 2
करण सिंह त्यागी
हिंदी. 4.
ए.आर.एम
जिथिन लाल
मल्याळम
5. कमिटी कुर्रोलु यधू वामसी
तेलुगु
नॉन-फीचर चित्रपट
सहा सदस्यांचा समावेश असलेल्या नॉन-फीचर चित्रपट ज्यूरीचे अध्यक्षपद प्रख्यात सिनेमॅटोग्राफर व चित्रपट निर्माते धरम गुलाटी यांनी भूषविले. या नॉन-फीचर ज्यूरीमध्ये खालील सदस्यांचा समावेश असून, हे सर्व सदस्य वैयक्तिकरित्या विविध प्रशंसित चित्रपटांचे प्रतिनिधित्व करतात आणि सुप्रसिद्ध चित्रपट व्यावसायिक आहेत आणि एकत्रितपणे भारतीय चित्रपट सृष्टीतील वैविध्याचे दर्शन घडवतात.
ज्यूरी सदस्यांची यादी:
अंजली पंजाबी – चित्रपट निर्माती व निर्माता
डॉ. बॉबी सर्मा बरुआ – चित्रपट निर्माती
रेखा गुप्ता – चित्रपट समीक्षक व क्युरेटर
अशोक कश्यप – निर्माता, दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर
ए. कार्तिक राजा – सिनेमॅटोग्राफर
ज्योत्सना गर्ग – चित्रपट निर्माती
एकूण 20 नॉन-फीचर चित्रपटांची निवड 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आयएफएफआय) इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. या चित्रपटांची निवड 550 समकालीन भारतीय नॉन-फीचर चित्रपटांमधून करण्यात आली आहे.
चित्रपटाचे शीर्षक
भाषा
दिग्दर्शक उम्मथत –
द रिदम ऑफ कोडावा
कोडावा
प्रकाश करियप्पा के
द अनटोल्ड अॅगनी
मराठी
जयराम भास्कर वाघमोडे
आनीराय
तमिळ
ई. व्ही. गणेशबाबू
दॅट्स अ रॅप
हिंदी
सनी हिंदुजा व शिंजिनी रावल
रूबरू
हिंदी
कपिल तन्वर
पिपलंत्री: अ टेल ऑफ ईको फेमिनिझम
हिंदी
सूरज कुमार
चंबल
हिंदी
अनहद मिश्रा
महिमा आलेख
ओडिया
हिमांशू शेखर खातुआ
निलगिरीस – अ शेअर्ड वाइल्डरनेस
इंग्रजी
संदेश कदूर
टा धॉम
हिंदी, मराठी, तमिळ
रोहित मोरे
शांग्रिला
सिक्कीमी
समतेन भूटिया
दीपा दीदी
हिंदी
सूर्या बालकृष्णन
हमसफर
मराठी
अभिजीत अरविंद दलवी
चौक युनिव्हर्सिटी का व्हाइस चान्सलर – पद्मभूषण अमृतलाल नागर
हिंदी
सविता शर्मा नागर व राजेश अमरोही
ऑस्लो – अ टेल ऑफ प्रॉमिस
इंग्रजी, मराठी
ईशा पुंगलिया
बॅटलफिल्ड
मणिपुरी
बोरुन थोकचोम
काकोरी
हिंदी
कमलेश के. मिश्रा
पत्रलेखा
आसामी
नम्रता दत्ता
चलो इंडियन विथ एरिक जी
इंग्रजी
राजदीप चौधरी
व्हेअर द हार्ट इज
मराठी
उल्का मयूर
भारतीय पॅनोरमा 2025 च्या उद्घाटनासाठी निवडलेला नॉन-फीचर चित्रपट ‘काकोरी (हिंदी)’ असून त्याचे दिग्दर्शन कमलेश के. मिश्रा यांनी केले आहे.
भारतीय पॅनोरमा हा उपक्रम 1978 साली आयएफएफआय (इफ्फी) च्या अंतर्गत सुरू करण्यात आला, ज्याचा उद्देश भारतीय चित्रपटांसह भारताची समृद्ध संस्कृती आणि वारसा यांना चित्रपट कलेच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे हा आहे. स्थापनेपासूनच भारतीय पॅनोरमा हा उपक्रम वर्षातील सर्वोत्तम भारतीय चित्रपट सादर करण्यास समर्पित राहिला आहे.
चित्रपटकलेच्या प्रसाराच्या उद्देशाने निवडलेल्या या चित्रपटांचे प्रदर्शन भारतात आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत आयोजित भारतीय चित्रपट सप्ताहांमध्ये, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या परिघाबाहेरील विशेष भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा उत्सवांमध्ये ना-नफा स्वरूपात करण्यात येणार आहे.
सर्वोत्तम वेब-सीरिज पुरस्कार – 2025
चार सदस्यांचा समावेश असलेल्या वेब-सीरिज ज्यूरीचे अध्यक्षपद प्रख्यात दिग्दर्शक व निर्माता भारत बला गणपती यांनी भूषविले.
ज्यूरी सदस्यांची यादी:
1.आर. महेंद्रन – निर्माता
2.मुंजाल श्रोफ – दिग्दर्शक व निर्माता
3.राजेश्वरी सचदेव – अभिनेत्री
4.शेखर कुमार दास – लेखक व दिग्दर्शक
वेब-सीरिजचे शीर्षक
दिग्दर्शक
निर्माते
निर्माता संस्था
ओटीटी प्लॅटफॉर्म. 1. मिट्टी – एक नयी पहचान
गगनजीत सिंग, आलोक कुमार द्विवेदी
आकाश चौला, अरुणवा जॉय सेनगुप्ता
फ्रेश लाईम फिल्म्स एलएलपी
अॅमेझॉन एमएक्स प्लेयर
2. बंधिश बँडिट्स सिझन 2
आनंद तिवारी
अमृतपाल सिंग बिंद्रा, आनंद तिवारी
लिओ मीडिया कलेक्टिव्ह प्रा. लि.
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ
3. पाताल लोक सिझन 2
अविनाश अरुण धवरे
सुदीप शर्मा
प्राईम व्हिडिओ, क्लीन स्लेट फिल्म्झ प्रा. लि., यूनोईया फिल्म्स
प्राईम व्हिडिओ
4. ब्लॅक वॉरंट
विक्रमादित्य मोटवाने
विक्रमादित्य मोटवाने, सत्यान्शू सिंग
अॅप्लॉज एंटरटेनमेंट, अँडोलन फिल्म्स, नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडिया एलएलपी
नेटफ्लिक्स
5. सुझल–द व्हॉर्टेक्स सिझन2
ब्रम्मा
पुष्कर ए. के. एस., गायत्री एस.
पुष्कर व गायत्री
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ



