Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*झी मराठी अवॉर्ड २०२५ च्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले डॉ. गिरीश ओक.*

*झी मराठी अवॉर्ड २०२५ च्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले डॉ. गिरीश ओक.*



मराठी टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित असा पुरस्कार सोहळा ‘ *झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ - सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!*  या सोहळ्याचे नेहेमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ अनेक खास सरप्राइज घेऊन येणार आहे. भावनांनी बहरलेला नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचे खास परफॉर्मन्सेस! यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘प्रेम, स्नेह, त्याग आणि करुणा’ या भावना साजऱ्या करणाऱ्या विविध थीम्सवर आधारीत एकाहून एक भन्नाट परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत. रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय कलाकृती ठरणार आहे. जशी सोहळ्याची आणि भन्नाट परफॉर्मन्सेस जशी उत्सुकता असते तशी जीवन गौरव कोणाला मिळणार याची देखील उत्सुकता असते. तर ह्या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकर ठरले ते म्हणजे जेष्ठ अभिनेते *‘डॉ. गिरीश ओक’.* 

“मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया| हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया|” मोहम्मद रफींच्या ह्या गाण्याला त्यांनी ओठांवरच्या शब्दांपुरतं मर्यादित नं ठेवता त्याला स्वतःच्या आयुष्याचं गाणं बनवलं. जसं कठीण अशा वैद्यकीय सूत्रांना गाण्याच्या चाली लावून त्याच्या भीतीचा रेट कमी केलात, तसंच कधीही, कुणालाही नं दिसलेला, कुठेही बाऊ नं केलेला, आपल्या नागपूरच्या संत्र्याच्या बर्फीपासून मुंबईतल्या वडापावपर्यंतचा प्रवास आपणच सहज सोपा केलात. 

“तो मी नव्हेच”, म्हणत गिरीश ओक ह्यांनी सगळ्याच क्षेत्रात मुशाफिरी केली! घरच्यांच्या शब्दाखातर डॉक्टर तर झालातच, पण उत्तम अभिनय करता करता सगळ्या गोष्टी विचित्र नव्हे, तर चिवित्र नजरेने पाहिल्यात, मग ते सह-कलाकाराला बुटाच्या लेसचे गोंडे करून १० डॉलरमध्ये विकणं असो, तर कधी २६ जुलैच्या पावसात घरावर ओढवलेल्या पूरपरिस्थितीनंतर झालेल्या मालिकेच्या परिसंवादात “बरेच दिवसांनी सगळं कसं शुभ्र, चकचकीत आणि नीटनेटकं दिसतंय” अशी स्वतःच्याच दुःखावर केलेली मिश्किल टिपणी असो! आपल्या अशा मिशीतल्या ह्युमरने आम्हाला हसवत राहिलात.



स्वप्नं सगळेच पाहतात, पण तुम्ही पायाशी लोळण घालणारं सुख बाजूला सारून मुंबईत आलात! मुंबईच्या या धावत्या जगण्यात भुकेसमोर पाणी पिऊन ढेकर द्यायची कला अवगत करून घेतलीत. “जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया” असं म्हणत, “आजच्या अपमानात उद्याचं यश शोधलंत, आणि एकलव्यासारखं शिकता शिकता पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी द्रोणाचार्य झालात”

आपला “डॉक्टर गिरीश ओक ते अभिनेता गिरीश ओक” हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. आपल्या अभिनयाच्या प्रवासात आपलं झी मराठीबरोबरचं असलेलं नातं अवंतिका, पिंजरा, या सुखांनो या, अधुरी एक कहाणी, जुळूनी येती रेशीमगाठी, पसंत आहे मुलगी, अग्गंबाई सासूबाई, अग्गंबाई सूनबाई, ते आताच्या लाखात एक आमचा दादापर्यंत अधिक घट्ट होत गेलं, आणि ते अजून वृद्धिंगत होत जावो हीच आपल्या लाडक्या बाप्पा चरणी प्रार्थना. 

डॉक्टर; आपली कला, आपली उर्जा, आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, तुमच्या अभूतपूर्व कार्याला सलाम!


*तेव्हा पहायला विसरू नका 'झी मराठी अवॉर्ड २०२५' ११ आणि १२ ऑक्टोबरला  संध्या. ७ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.