Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*गोव्या मध्ये भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण !*

*गोव्या मध्ये भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण !*



लोकप्रिय आणि प्रेक्षकप्रिय महामालिका *"लक्ष्मी निवास"* सध्या आपल्या कथानकाच्या अत्युच्च बिंदूवर पोहोचली आहे. *गोव्यात सुरू असणाऱ्या  या विशेष ट्रॅकमध्ये एकीकडे भावना आणि सिद्धू अधिक जवळ येताना दिसणार आहे, तर दुसरीकडे जयंत आणि जान्हवी यांचं नातं एका अनपेक्षित वळणावर येणार आहे* .  संपतराव भावना आणि सिद्धूला हनीमूनसाठी गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतात. सिद्धू आपल्या प्रेमाची कबुली द्यायची संधी म्हणून या प्रवासाकडे पाहतो आणि आपल्या खास मैत्रिण लक्ष्मी श्रीनिवासलाही यायचा आग्रह करतो. ते होकार देताच, भावना-सिद्धू, लक्ष्मी- श्रीनिवास गोव्यात पोहोचलेत . तर दुसरीकडे जयंत जान्हवीला तिला फिरायला घेऊन जाणार आहे आणि ते ठिकाण ही गोवाच आहे, या तिन्ही जोडप्यांची गोव्यातील भेट एक नवा ड्रामा तयार करणार आहे. गोव्याच्या  किनाऱ्यावर आणि आनंदी वातावरणात भावना आपल्या मनातील प्रेम सिद्धू समोर व्यक्त करणार आहे. सिद्धू या क्षणाने भारावून जाऊन दोघांच नातं एका नव्या वळणावर पोहोचणार आहे. दुसरीकडे जयंतच्या वागणुकीमुळे जान्हवी अस्वस्थ आहे. ती परत जाण्याचा हट्ट धरते. त्यातच जयंतला कळते की लक्ष्मी- श्रीनिवास देखील तिथेच आहे,  जान्हवी आणि त्यांची  भेट होऊ नये म्हणून त्याची धडपड सुरू होते.



जान्हवीला कळणार आहे की जयंतने आजीला मारण्याचा प्रयत्न केला होता. हा धक्का तिच्या मनाला हादरवून टाकतो. तिच्या मनातील प्रेम, विश्वास आणि राग यांचा स्फोट होतो. क्रूजवर या सगळ्याचा शेवट एका जबरदस्त वळणावर होणार आहे. आता जान्हवीचं पुढे काय होणार? जयंतला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळेल का? भावना आणि सिद्धूचं कोणतं वेगळं वळण घेईल ? आणि सर्वात महत्त्वाचं, लक्ष्मी श्रीनिवासची भूमिका या सगळ्यात कितपत निर्णायक ठरेल ? प्रेक्षकांनी या उंचावलेल्या उत्कंठेच्या क्षणी एकही भाग चुकवू नका, कारण पुढे काय होणार हे अजूनही एक रहस्य आहे!


*तेव्हा बघायला विसरू नका 'लक्ष्मी निवास' दररोज रात्री ८:०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.