Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*साइली उर्फ नेहा हरसोरा म्हणाली “स्टार प्लसच्या शुभारंभने दिली कुटुंबासोबत क्वालिटी टाइम व्यतीत करण्याची संधी”*

 *साइली उर्फ नेहा हरसोरा म्हणाली “स्टार प्लसच्या शुभारंभने दिली कुटुंबासोबत क्वालिटी टाइम व्यतीत करण्याची संधी”*


स्टार प्लसने आपल्या प्रेक्षकांचे नेहमी हुकमी मनोरंजन केले आहे. या वर्षी या वाहिनीने शुभारंभची घोषणा करून एका खास सोहळ्याची सुरुवात केली आहे. स्टार प्लसवरील विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या लोकप्रिय कलाकारांना एका छताखाली आणणारा शुभारंभ हा केवळ एक मनोरंजक कार्यक्रम नाही. लोकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या सेगमेन्टमध्ये स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 ची नामांकने देखील जाहीर करण्यात आली. असा हा नाट्य, सेलिब्रेशन आणि पारिवारिक नाती यांचा संगम घडवणारा एक देखणा कार्यक्रम आहे.



*शुभारंभचा एक भाग असलेली, मालिकेत सायलीची भूमिका करणारी नेहा हरसोरा आपला आनंद आणि उत्साह व्यक्त करत म्हणाली,* “शुभारंभ अॅक्टसाठी समस्त देशमुख परिवार एकत्र आला. आणि या अॅक्टमुळे आम्हाला ही देखील समजले की, कोणाला कोणत्या पदासाठी नामांकन मिळाले आहे. हा खूप मस्त अनुभव होता, कारण फक्त सचिन किंवा सायली असण्याच्या पलीकडे जाऊन आम्हा सर्वांना एकमेकांसोबत मस्त वेळ घालवण्याची संधी मिळाली. शिवाय, इतर बऱ्याच अक्टीव्हिटीज असल्यामुळे खूप धमाल आली.”


*स्पर्धात्मक तरीही हलक्या-फुलक्या भावनेमुळे हा सोहळा कसा विशेष मजेदार बनला हेही तिने सांगितले:* “सगळ्यात मजेदार अॅक्ट होता तीन भावांमधला खेळकर सामना आणि सुनांचा परस्परांशी आमना-सामना. आम्ही खूप गेम्स खेळलो, जे नामांकनांशी संबंधित होते. यामुळे कार्यक्रमातील रोमांच आणखीनच वाढला. यात जिंकणे महत्त्वाचे नव्हते, तर एक कुटुंब म्हणून त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे होते. एकत्रित असल्याच्या भावनेमुळे हा सोहळा विशेष ठरला. आम्ही फक्त स्वतःच्या परिवारातत परस्पर स्पर्धा करत नव्हतो, तर स्टार परिवारातील इतर सदस्यांशी देखील आमची स्पर्धा होती.”


एकंदरित, शुभारंभ अॅक्ट भलताच मजेदार, संस्मरणीय आणि पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही आमची नाती दृढ बनवणारा होता.

ही धमाल बघायला विसरू नका! शुभारंभ इव्हेंट स्टार प्लसवर 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी 6:30 वाजता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.