*इंद्रायणीची घोषणा! शाळेचा पाया रचणीस होणार खास व्यक्तीच आगमन - पण कोण?”*
पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई १८ ऑक्टोबर, २०२५ :* कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत विठूच्या वाडीतील राजकारणाचा पट आता अधिक रंगतदार बनला आहे. गावाच्या विकासाचा व शिक्षणाच्या नव्या पर्वाचा मुद्दा उचलून धरत गावात डॉक्टर गोपाळ दिग्रसकर आणि अधोक्षज महाराज दिग्रसकर यांच्यात झालेला वादसंवाद साक्षात रणसंग्रामात परिवर्तित झाला. गावातील मंडपात जमलेल्या ग्रामस्थांसमोर मोहितराव बोडके यांच्या सूत्रसंचालनाखाली दोन्ही भावांमधील हा ‘विचारांचा संघर्ष’ पाहायला लोक उत्साहाने जमले होते. विज्ञान, आधुनिक विकास आणि ज्ञानाचा पुरस्कार करणारा डॉक्टर गोपाळ तर परंपरा, संस्कार आणि माणुसकीचा पुरस्कार करणारा अधोक्षज या दोन विचारसरणींची थेट टक्कर सर्वांसमोर होणार आहे. गावाच्या विकासावरून गोपाळ-अधोक्षज यांच्यात वैचारिक टक्कर बघायला मिळणार आहे. अधोक्षजचे म्हणणे “मातीशी निष्ठा जोडली तरच प्रगती होईल”. मोहितरावचा सूडभावनेने इशारा देताना दिसणार आहे कि “ही शाळा उभी राहू देणार नाही!” ह्या वादसंवादाने गावाचा राजकीय तापमान शिगेला पोहोचलं आहे. असे असतानाच इंद्रायणी जाहीर करते की दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शाळेची पहिली विट ठेवली जाणार आहे आणि ती पण एका खास व्यक्तीकडून. आनंदी आणि विंझेची तीव्र उत्सुकता आहे कि “कोण आहे ती खास व्यक्ती?” का आहे त्यांना हि उत्सुकता. “ती खास व्यक्ती कोण असणार?” हा प्रश्न आता गावभर चर्चेचा विषय ठरला आहे. जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
दिवाळीच्या मुहूर्तावर विठूच्या वाडीतल्या शाळेची पहिली वीट ठेवली जाणार इंद्रायणी हि घोषणा करताच सगळ्यांच्या नजरा त्या “खास व्यक्ती” वर खिळल्या आहेत. हि व्यक्ती कोण ठेवणार? गोपाळने विकासाच्या नावाने आधुनिकतेचा युक्तिवाद मांडला, तर अधोक्षजने मातीशी निष्ठा, संस्कार आणि माणुसकीचा मुद्दा भिडवला. आणि त्यामुळे संपूर्ण जनसमुदाय भारावला. वादसंवादाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार ? नक्की बाजी कोण मारणार ? मोहीतराव कोणता डाव खेळणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. विठूच्या वाडीची प्रगती शिक्षणाने होणार... आणि त्यासाठी आम्ही शाळा उभी करणारच! या दिवाळीच्या मुहूर्तावर एका खास व्यक्तीच्या हातून शाळेची पहिली वीट ठेवली जाणार आहे!” इंद्रायणीच्या या घोषणेनं सभागृहात खळबळ उडणार आहे. आनंदी आणि विंझे यांच्या चेहऱ्यावर असलेली उत्सुकता जरा वेगळीच आहे, काय आहे त्यांच्या मनात? मोहीतराव यांनी दिलेले आव्हान आहेच पण इंदू आणि अधूला एकमेकांची साथ मिळाली आहे त्यामुळे दोघांच्या चेहऱ्यावर निर्धार, विश्वास आणि नव्या पर्वाची चाहूल. आता हा खास व्यक्ती कोण ? हे उलगडणार आहे ह्या आठवड्यात.
नक्की पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.



