*कलर्स मराठीवर रंगणार महासंगमचा महाआठवडा’ - दिसणार इंद्रायणी आणि वल्लरीच्या मैत्रीची ताकद!*
‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचे एका तासाचे भाग - ६ ते ११ ऑक्टोबर, संध्या. ७ वा. फक्त कलर्स मराठीवर
मुंबई ६ ऑक्टोबर, २०२५ : कलर्स मराठी नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं, भव्य आणि भावनिक अनुभव देत असते. आता प्रेक्षकांसमोर येत आहे असाच एक अनोखा सप्ताह ‘महासंगमचा महाआठवडा’! दोन लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिका एका धाग्यात गुंफल्या जाणार. ६ ते ११ ऑक्टोबर या आठवड्यात संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रसारित होणाऱ्या या विशेष भागांमध्ये पहायला मिळणार आहे- मैत्रीची कसोटी, एकत्र येऊन संकटावर मात करण्याची ताकद आणि नाट्यमय घडामोडी. इंदू आणि अधू मुंबईत एका नव्या प्रवासासाठी येतात, तर दुसरीकडे वल्लरी, प्रेरणा, तेजा आणि श्वेता यांच्या आयुष्यात एकाचवेळी वादळ उठतं. एका बाजूला जीवघेणी पाठलागाची थरारक लढाई, तर दुसऱ्या बाजूला प्रेम, मैत्री आणि विश्वासाची कसोटी. पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत अण्णा केदार प्रेरणाचे अपहरण करतो आणि त्यामुळे पिंगा गर्ल्स खचून जातात या संकटात नक्की काय करावं हे त्यांना समजेनासं होऊन बसतं ... तर दुसरीकडे, इंदूच्या शाळेचे स्वप्न साकारण्यासाठी ती अधूसोबत मुंबईला येणार असते कारण वल्लरी तिला तिचं स्वप्न पूर्ण कारण्यात मदत करणार आहे. या सगळ्यात प्रेरणाला शोधण्यात इंदूच्या विठु रायावरील श्रद्धा आणि तिच्यातील सकारात्मकता पिंगा गर्ल्सना उभारी देते. कशी इंदू आणि वल्लरी, पिंगा गर्ल्स मिळून प्रेरणाचा शोध घेणार ? अण्णा केदारचा प्लॅन कसा उधळून लावणार, आणि इंदूचे स्वप्न पूर्ण करण्यात वल्लरी तिला कशी मदत करणार हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की पहा महासंगमचा महाआठवडा’ 'इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचे एका तासाचे विशेष भाग ६ ते ११ ऑक्टोबर, संध्या. ७ वा. पासून फक्त कलर्स मराठीवर
या महासंगमासाठी सलग दिवस रात्र एक करून आठ दिवसांचं शूटिंग करण्यात आलं. कलाकार वर्गासह मोठे ॲक्शन सिक्वेन्सेस, थरारक रस्त्यावरील सीन आणि भावनिक प्रसंग यांचं चित्रण अत्यंत काटेकोर नियोजनानं पूर्ण करण्यात आलं. निर्मात्यांनी महासप्ताह असल्यामुळे विशेष काळजी घेतली वेळेचं अचूक नियोजन, अनेक लोकेशन्सवर एकाचवेळी शूट आणि पाचही नायिका एकत्र असलेले सीन यामुळे सेटवर धम्माल वातावरण होतं. उन्हात उभं राहून झालेले फाईट सिक्वेन्सेस खूपच कठीण होते पण कलाकारांच्या जिद्दीमुळे आणि टीमवर्कमुळे सगळं काम वेळेत पूर्ण झालं. या शूट दरम्यान प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत जीव ओतला मग ती थरारक ॲक्शन असो वा भावनिक प्रसंग. सेटवर सगळ्यांनी मिळून केलेली मजा, आणि एकमेकांना दिलेला पाठिंबा यामुळे या महासंगमचं वातावरण अगदी कौटुंबिक होतं. या विशेष आठवड्यात ‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मधील पाच नायिका इंदू, वल्लरी, प्रेरणा, तेजा आणि श्वेता पहिल्यांदाच action mode मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांची एकत्र केमिस्ट्री, त्यांचं एकत्र काम करणं आणि त्या सर्वांनी निर्माण केलेली भावनांची उर्मी प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
याबद्दल बोलताना वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणाली, पिंगा गं पोरी पिंगा आणि इंद्रायणी मालिकेचा महासप्ताह आणि त्यासाठीची जोरदार तयारी सुरु आहे... उत्तम प्लांनिंग, उत्तम execution चे उदाहरण म्हणजे हा महासंगम. मारामारी, fight sequence करताना खूप मेहेनत घेतली आहे... मी पहिल्यांदाच हार्नेस लावून fighting केली आहे... हवेत उडते आहे, त्यामुळे खूप मज्जा येते आहे. मला height ची थोडी भीती आहे. उंचावरून मी पटकन खाली बघू शकत नाही. जेव्हा मला कळलं कि मी हार्नेस लावून वर हवेत जाणार, तेव्हा मी खूपच घाबरले होते. असे अनेक प्रसंग आले ज्याचे शूट करताना खूप धम्माल आली, कधी भावुक झालो... इंद्रायणी आणि अधू देखील या महासंगमसाठी आले आहेत मुंबईला खूप भारी वाटलं त्यांच्यासोबत पुन्हाएकदा काम करताना... विशेष म्हणजे वल्लरी आणि पिंगा गर्ल्सना इंदू - अधूची साथ मिळणार आहे. तुम्ही पण नक्की बघा हा महाठवाडा."
इंद्रायणी म्हणजेच कांची शिंदे म्हणाली, "महासंगमचा महाआठवडा असल्याने आम्ही मुंबईला आलो आहोत इंद्रायणी, अधू आणि श्रीकला. कारण महानाट्य घडणार आहे. खूप आव्हानं आहेत... वेळ कमी आहे काम खूप आहे... इंद्रायणीचे जे स्वप्न आहे गावातील मुलांसाठी शाळा उभी करण त्यासाठी वल्लरी तिला मदत करणार आहे आणि त्यासाठी ती मुंबईला आली आहे. इंदूचं संकटातून वाट दाखवणारं, मनाला उभारी देणारं कीर्तन असणार आहे. याआधी असं कीर्तन प्रेक्षकांनी कधीच पाहिलं नाही. हे कीर्तन करताना एक वेगळचं आव्हानं होतं पण दिगदर्शकाच्या मार्गदर्शनामुळे ते उत्तमरित्या पार पडले. हे कीर्तन कायमस्वरूपी लक्षात राहील असं आहे. प्रेरणाला वाचविण्यासाठी आम्ही सगळ्या मुलींनी fight केली आहे. यावेळेस कीर्तन करण्याचा अनुभव यावेळचा खास होता... संपूर्ण टीम वेगळी होती... पण शेवटी कीर्तन उत्तमरीत्या पार पडलं. दिगदर्शक, आमची टीम, स्पॉट दादा सगळयांनी टाळ्या वाजवल्या तो अनुभव काही वेगळाच होता. आम्ही प्रचंड मेहेनत घेतली आहे तुम्हाला देखील हा महासंगम नक्कीच आवडेल याची आम्हांला खात्री आहे."
