Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*फ्रेश लुक असलेला "लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाचा टीजर लाँच*

*फ्रेश लुक असलेला "लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाचा टीजर लाँच*

*२१ नोव्हेंबरला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार*


गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या "लास्ट स्टॉप खांदा" या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. फ्रेश लुक असलेला हा चित्रपट २१ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.



शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी "लास्ट स्टॉप खांदा... " प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे.नृत्यदिग्दर्शक म्हणून राहुल बनसोडे, रवी आखाडे यांनी काम पाहिले आहे


प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर 'लास्ट स्टॉप खांदा... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. टीजरमध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांकडे बोलते तिच्या भावना व्यक्त करते. माझं ब्रेकअप झाले आहे, मी आत्महत्या करते असं ती मुलगी म्हणते. त्या मुलीच्या मनोगतावर एक घनदाट झाड, समुद्र किनारा अशी देखणी व्हिज्युअल्स दिसतात. त्यामुळे आशय संपन्न, खुसखुशीत, हलकीफुलकी प्रेमकथा या चित्रपटातून अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत या टीजरमधून मिळतात. संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता २१ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


*Teaser Link*

https://youtu.be/u9CH1q4NpJM?si=Sy6RtBUv37d53OMF



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.