Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नव्याची सुरुवात, सारंग - सावलीचा गृहप्रवेश!*

*लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नव्याची सुरुवात, सारंग - सावलीचा  गृहप्रवेश!*

*महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडचणीत!*



 

 दोन प्रेक्षकप्रिय मालिका "पारू" आणि "सावळ्याची जणू  सावली" पुन्हा एकदा एकत्र येत आहेत एका विशेष महासंगमासाठी. नाट्यपूर्ण घडामोडी, आणि मैत्रीच्या नव्या रंगांनी सजलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. या महासंगमात काही जुने रहस्य खुले होणार आहेत, तर काही नात्यांना नवे वळण मिळणार आहे. शिवानीने आखलेला धोकादायक प्लॅन सारंगच्या कुटुंबाला अडचणीत टाकण्यास सुरुवात करतो. छोट्या छोट्या घटनांमधून गोंधळ वाढत जातो आणि नाती धोक्याच्या टोकावर पोहोचतात. दरम्यान, तिलोत्तमा आणि चंद्रकांत यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी किर्लोस्कर कुटुंब आणि आदित्य–पारू यांना आमंत्रण दिलं जातं. हा क्षण आनंदाचा असला तरी प्रत्येकाच्या मनात शंका आणि ताण असतो. पार्टी दरम्यान, अहिल्या आणि पारू समोरासमोर येतात. जुन्या गोष्टी आणि भावनिक संघर्ष पुन्हा उफाळून येतात. त्याचवेळी, एक जुनी मर्डर केस पुन्हा वर बाहेर येणार आहे. त्यात सारंग व आदित्य त्यात अडकणार आहेत. यात सारंग कोर्टाच्या खटल्यात अडकणार आहेत. कोर्टात अहिल्या विरुद्ध पारू–आदित्य असा संघर्ष उभा राहणार आहे. दुसरीकडे, शिवानी आणि सावली–सारंग  यांच्यातील संघर्षही वाढलाय. सावली आणि पारू एकत्र येऊन या कठीण प्रसंगाला सामोरं जाणार आहेत. केस अधिक गुंतागुंतीची होत असताना वकील म्हणून कालिंदीची दमदार एन्ट्री होणार आहे. 


 

कालिंदीच्या हुशारीमुळे सारंगची केस एका रोमांचक वळणावर येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारंग - सावलीच्या घरात आनंदाने गृहप्रवेश होणार आहे.  

*तेव्हा बघायला विसरू नका महासंगम विशेष भाग 'सावळ्याची जणू सावली' आणि 'पारू'  संध्या ६:३० पासून सदैव तुमची झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.