Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!*

 *तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!*

*‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला*



एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता या चित्रपटातील पहिलं गोड, रोमँटिक गाणं ‘ये ना पुन्हा’ प्रदर्शित झालं आहे.


रोहित राऊतच्या युथफुल आणि फ्रेश आवाजात सादर झालेलं हे गाणं श्रोत्यांना प्रेमाच्या नव्या भावविश्वात घेऊन जाणारं आहे. अविनाश–विश्वजीत यांनी दिलेलं आकर्षक आणि मॉडर्न टच असलेलं संगीत, तसेच विश्वजीत जोशी यांनी लिहिलेले आजच्या पिढीच्या मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं तरुणाईला निश्चितच आवडेल. हे गाणं ऐकताच कोणालाही प्रेमात हरवल्यासारखं, आठवणींमध्ये रममाण झाल्याचं वाटेल.


दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात, “प्रेमाच्या प्रवासातील काही क्षण आयुष्यभर लक्षात राहातात. ‘ये ना पुन्हा’ हे गाणं त्या क्षणांची जादू प्रामाणिकपणे पकडतं. पडद्यावर ही भावना आणताना आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये युथच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न केला आहे.”


निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “हे गाणं ऐकल्यावर मनात पुन्हा प्रेम फुलल्यासारखं वाटतं. शब्द, संगीत आणि रोहितचा आवाज – या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन हे गाणं आजच्या तरुणाईला आणि संगीतप्रेमींना नक्की भावेल.”



गायक रोहित राऊत म्हणतो, “या गाण्याचा प्रत्येक सुर आणि शब्द खूप खास आहे. गाताना मला जबरदस्त मजा आली आणि खात्री आहे की, हे गाणं ऐकताना प्रत्येकजण आपल्या लव्हस्टोरीशी रिलेट करेल.”


संगीतकार अविनाश–विश्वजीत म्हणतात, “हे गाणं तयार करताना आमचं एकच ध्येय होतं ते म्हणजे आजच्या युथला एक शुद्ध, रोमँटिक आणि जादुई अनुभव देणे. आम्हाला विश्वास आहे की, हे गाणं सर्व संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून जागा मिळवेल.”


एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया तर सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या नव्या प्रेमकथेत ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम हे कलाकार झळकणार आहेत. प्रेम आणि नशिबाचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांना एक नवा, ताजातवाना अनुभव देईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.