Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृती सुरु

 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृती सुरु


एफटीआयआय 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे एक दिवसाचा चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार

Posted On: 14 OCT 2025 7:50PM by PIB Mumbai

मुंबई, 14 ऑक्टोबर 2025


News By -----  दिलीप. रा . यादव 

                        वरिष्ठ पत्रकार.


56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यातील पणजी इथे आयोजित केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चित्रपटांचा हा 9 दिवसांचा जागर होणार असून त्यात 45 हजाराहून अधिक चित्ररसिक व व्यावसायिक सहभागी होणार आहेत.  जागतिक स्तरावर उत्कृष्ट गणल्या गेलेल्या चित्रपटांचा हा मेळावा अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार होणार आहे. 



तुम्ही पत्रकार आहात का? तर मग या महोत्सवाचे वार्तांकन करणारे माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx या पोर्टलला भेट द्या. माध्यम अधिस्वीकृतीसाठी हे पोर्टल येत्या 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत खुले आहे.    


सर्व विशेष चित्रपट प्रदर्शने, पॅनेल चर्चासत्रे व चित्रपटनिर्मात्यांसमवेत कार्यक्रमांमध्ये केवळ अधिस्वीकृत  माध्यम व्यावसायिकांनाच  प्रवेश मिळेल.याशिवाय, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी  संस्था (FTII) 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे फक्त अधिस्वीकृत  पत्रकारांसाठी खास चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार आहे. चित्रपटांचा अर्थ समजून घेत आस्वाद घेण्याचे तंत्र शिकण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ज्या पत्रकारांना आधीच्या महोत्सवातील या अभ्यासक्रमाचा लाभ घेता आला नव्हता, त्यांना यावेळी प्रथम संधी देण्यात येईल.  


जगभरातील चित्रपट निर्मात्यांच्या वैविध्यपूर्ण  दृष्टिकोनांसाठी  इफ्फी च्या  आयोजनामुळे एक  व्यासपीठ मिळेल असे पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान  महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी अधोरेखित केले आहे. या महोत्सवाचे वार्तांकन करणाऱ्या  पत्रकारांसाठी अधिस्वीकृती  प्रक्रिया सुलभ व सुरळीत व्हावी यासाठी पत्र सूचना कार्यालय वचनबद्ध असून पत्रकारांना सर्वतोपरी साहाय्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. 


माध्यम प्रतिनिधींनी पोर्टलवरील सूचना काळजीपूर्वक वाचून अर्जासोबत  आपली ओळखपत्रे, व्यावसायिक परिचयपत्रे इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे  सादर करावीत.पात्रता व कागदपत्रांच्या विस्तृत माहितीसाठी अर्जदारांनी कृपया पोर्टलवरच्या  मार्गदर्शक सूचना पाहता येतील.


अधिस्वीकृतीसंदर्भात  शंकानिरसन  व मदतीसाठी पत्रकारांनी विशेष पीआयबी माहिती कक्षाशी iffi.mediadesk@pib.gov.in येथे संपर्क साधावा. 


निसर्गसुंदर  पणजी शहरात इफ्फी साठी एक उत्तम सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभणार असून यातून भारताच्या समृद्ध चित्रसंस्कृतीचे दर्शन आंतरराष्ट्रीय समुदायाला घडेल व सिनेजगताला आंतरराष्ट्रीय सहकार्याची जोड मिळेल. 


महत्वाची माहिती:


अधिस्वीकृती पोर्टल खुले : 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025


महोत्सव तारखा : 20 ते 28 नोव्हेम्बर 2025


चित्रपट रसग्रहण  अभ्यासक्रम : 18 नोव्हेंबर 2025


स्थळ : पणजी, गोवा. 


अधिस्वीकृती  पोर्टल : https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx


मदत कक्ष ई-मेल : iffi.mediadesk@pib.gov.in


आशियातील  या प्रमुख चित्रपट महोत्सवात  आपला सहभाग नक्की करण्यासाठी , कॅमेऱ्या मागच्या कथा अनुभवण्यासाठी आणि जगभरातील चित्रकर्त्यांच्या तसेच प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला सादर करणाऱ्या या व्यासपीठाचा एक भाग होण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.