Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश*

 *'आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश* 


बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट आरपार ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले – “Running in theatres. Must watch guys. #AarPar”.


या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ह्रुता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पाटकी यांना टॅग केलं.



12 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आरपार हा प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्ष यांवर आधारित चित्रपट असून सध्या थिएटर्समध्ये चांगल्या प्रतिसादासह झळकत आहे. राजकुमार राव यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्याने दिलेल्या या पाठींब्यामुळे चित्रपटाला अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.



मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दमदार कथा सांगण्याची परंपरा जपली असून, बॉलिवूडमधील मोठ्या नावांचा पाठिंबा मिळाल्याने आरपार सारखे चित्रपट अधिक चर्चेत येत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.