*राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा*
या आठवड्यात ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये एक खास आठवडा – सुपर क्लासिक – ज्या अंतर्गत मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली.
आदितीचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरतो, कारण या आठवड्यात तिला मिळतो एक खास संदेश – तोही थेट राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि 'जोगवा' चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले मराठी सिनेअभिनेते उपेंद्र लिमये यांच्याकडून.
*सातारहून पाठवलेल्या या संदेशात उपेंद्र लिमये म्हणतात,*
*"ही माझी खास शुभेच्छा आहे त्या एकासाठी — जिला साताऱ्याने घडवलंय आणि जिला आज संपूर्ण भारत पाहतोय सुपर डान्सरमध्ये. आपल्या साताऱ्याचीच लेक – आदिती – कमाल, अप्रतिम, सुंदर! तुझं १००% देणं प्रत्येकवेळी दिसतं. तुला खूप खूप शुभेच्छा. साताराही तुझ्यासोबत आहे, आणि आता संपूर्ण महाराष्ट्रही! ऑल द बेस्ट!"*
आपल्या गावाचं नाव उज्वल करणारी आदिती आज महाराष्ट्रभरातील लहानग्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. उपेंद्र लिमये यांच्या शब्दांनी तिच्या नृत्ययात्रेला नवे बळ मिळाले आहे.
*हा खास भाग चुकवू नका! ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ पाहा, शनिवार आणि रविवार, रात्री ८ वाजता – फक्त Sony Entertainment Television आणि SonyLIV वर.*
