*अनुराग कश्यप यांचा "निशानची" चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित!*
*अनुराग कश्यप आणि अॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया यांच्या "निशानची" चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित*
याचा अर्थ उद्यापासून खरा सिनेमॅटिक धमाका सुरू होणार आहे! "निशानची"च्या टीझरने आधीच या चित्रपटाची जगाला पहिली झलक दाखवली आहे आणि संगीताने तर आधीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रेक्षक ट्रेलरच्या आणखी एका झलकसाठी उत्सुक आहेत. चित्रपटातील दमदार डायलॉग्स लवकरच सगळ्यांचे आवडते होणार, याबद्दल शंका नाही. तसेच एक फ्रेश आणि टॅलेंटेड कास्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
हेही लक्षात घ्या की, चित्रपटात प्रमुख भूमिकेत डेब्यूटंट ऐश्वर्य ठाकरे आहेत, जे दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत.
अॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप – जे त्यांच्या बोल्ड आणि दमदार स्टोरीटेलिंगसाठी ओळखले जातात – ३ सप्टेंबर रोजी अधिकृत ट्रेलर लाँच करणार आहेत. हा ट्रेलर प्रेक्षकांना अॅक्शन आणि ड्रामाचा एक हाय-ऑक्टेन मिक्स देणार आहे – म्हणजेच, एक सच्चा मसाला एंटरटेनर कसा असावा याची परिभाषा ठरणार आहे.
या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या सिनेमाच्या विश्वाची खरी झलक मिळेल – आणि थिएटरमध्ये टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर ऐकायला मिळेल, हे नक्की!
https://www.instagram.com/p/DOFwCjcjNfY/
https://x.com/AMZMGMstudiosIN/status/1962764939208032527
"निशानची" ही दोन भावांच्या गुंतागुंतीच्या गोष्टीवर आधारित आहे, जे वेगवेगळ्या वाटांवर आहेत आणि त्यांचे निर्णय त्यांचे नशिब ठरवतात. या चित्रपटात वेदिका पिंटो, मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे कलाकारही आहेत, जे कथेला अधिक खोल आणि दमदार बनवतात.
गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा रॉ, एनर्जेटिक आणि देसी फ्लेवरने भरलेली आहे, जी फक्त थिएटरमध्येच अनुभवल्या सारखी आहे.
अजय राय आणि रंजन सिंग यांच्या "जार पिक्चर्स" या प्रोडक्शन हाउसच्या बॅनरखाली, "फ्लिप फिल्म्स"सोबत असोसिएशनमध्ये हा चित्रपट तयार झाला आहे. या चित्रपटाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी एकत्र लिहिलेली आहे.
अॅक्शन, ह्यूमर आणि ड्रामा यांचा अफलातून मिलाफ असलेला हा मसाला एंटरटेनर येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
