*इंद्रायणीच्या स्वप्नांमागचं रहस्य नेमकं काय असेल ?*
*कोण आहे गावात आलेली नवी व्यक्ती?*
पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई २१ ऑगस्ट, २०२५ :* कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेची कथा प्रत्येक आठवड्यात नवे रंग घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. गावातील शाळा की मंदिर या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. भूमिपूजनावेळी सापडलेली विठ्ठलाची मूर्ती गावकऱ्यांसाठी आश्चर्य ठरते. या प्रसंगाचा फायदा घेत मोहितराव स्वतःच्या हेतू लपवून गावकऱ्यांसमोर मंदिर उभारणीचा मुद्दा पुढे करतो. इतकंच नव्हे, तर तो इंद्रायणीचाच सत्कार विठ्ठल मंदिरात करून गावात आपली घोषणा ठरवतो. मात्र, इंद्रायणीचे ठाम नकार गावातील काही मंडळींना पटत नाहीत आणि त्यामुळे गावात एक नव्या तणावाची बीजे पेरली जातात. अशा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीच्या स्वप्नात पुन्हा एकदा दैवी संकेत दिसतो मोठं संकट जवळ येत असल्याचं भाकीत तिच्या मनात उमटतं. हे संकट नेमकं कोणतं, कोणावरून येणार, आणि दिग्रसकर घराणं कसं गुंतणार, ही नवी मुलगी कोण आहे ? याविषयी मात्र अद्याप गूढ दाटलेलं आहे. हि व्यक्ती नक्की कोण आहे पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
प्रश्न असा ही नवीन आलेली मुलगी कोण आहे? तिचा उद्देश काय आहे? इंद्रायणीच्या अंतर्मनाने दाखवलेली नकारात्मक भावना खरी ठरणार का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, दिग्रसकर घराण्याच्या आयुष्यात येणारं संकट या नव्या व्यक्तीशी जोडलेलं असेल का? दरम्यान, व्यंकू महाराजांची भूमिका महत्त्वाची ठरते. लोकांच्या भावना सांभाळत ते एका कीर्तनातून गावकऱ्यांना पटवून देतात की मंदिरापेक्षा शाळा उभारणेच आजच्या काळाची खरी गरज आहे. शिक्षणाची दीपशिखा पेटवणं हेच खऱ्या अर्थाने विठोबाला प्रिय आहे, असा संदेश देऊन ते गावकऱ्यांच्या मनात नवी विचारसरणी रुजवतात.
इंद्रायणीच्या आयुष्यात उलगडणारी ही नवी कहाणी गावाचं आणि घराचं भविष्य कोणत्या दिशेने नेणार हे जाणून घेणं आता प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे. तेव्हा मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.


