Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भव्य नवरात्रीसाठी स्टार प्लस सज्ज; देवीच्या नऊ रूपांमध्ये दिसणार मालिकेतील लोकप्रिय स्त्री-व्यक्तिरेखा

 *भव्य नवरात्रीसाठी स्टार प्लस सज्ज;  देवीच्या नऊ रूपांमध्ये दिसणार मालिकेतील लोकप्रिय स्त्री-व्यक्तिरेखा*


स्टार प्लस वाहिनी नेहमीच ही खातरजमा करते की, सणासुदीच्या उत्साही वातावरणात देखील आपले प्रेक्षक संलग्न राहतील. आणि या नवरात्रीतील आनंद सोहळा जरा विशेषच असणार आहे. वाहिनी एक अनोखी उत्सवी लाइन-अप घेऊन येत आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून देवीच्या नऊ दिव्य रूपांचे दर्शन घडेल. अशाप्रकारे स्टार प्लसने आध्यात्मिकता आणि दमदार मालिकांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.



अलीकडेच आलेल्या एका प्रोमोमध्ये या लाइन-अपच्या प्रारंभी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील तुलसी दिसते आणि तिच्या पाठोपाठ ‘अनुपमा’ मालिकेतील अनुपमा, ‘उडने की आशा’ मालिकेतील सायली, ‘अनुपमा’मधील राही, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिरा, ‘आरती अंजली अवस्थी’ मालिकेतील आरती, ‘ईशानी’ मालिकेतील ‘ईशानी’, ‘संपूर्णा’ मधील मिट्टी आणि ‘झनक’ मधील झनक या व्यक्तिरेखा दिसत आहेत. ही प्रत्येक व्यक्तिरेखा देवीचे एक रूप दाखवेल ज्यामध्ये शक्ती, लवचिकता आणि भक्ती प्रतिबिंबित झालेली दिसेल. उत्कट भावना आणि हाय व्होल्टेज ड्रामासह ही नवरात्र भक्तीमय आणि नाट्यमय होणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षक नक्कीच टीव्हीच्या पडद्याशी खिळून राहतील.


नवरात्री म्हणजे प्रार्थना-अर्चना आणि आनंद सोहळा तर खराच, पण त्याचबरोबर नवरात्री हे सकारात्मकतेचा विजय आणि शक्तीचे पर्व आहे. स्टार प्लस वाहिनी विशेष एपिसोड सादर करून आपली संस्कृती आणि परंपरा यांचा आनंदोत्सव साजरा करत प्रेक्षकांना आपलेसे करण्याचा आपला वारसा पुढे चालू ठेवत आहे.


श्रद्धा आणि नाट्य यांचा हा भव्य सोहळा अजिबात चुकवू नका. पहात रहा, 1 ऑक्टोबर दरम्यान दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्लसवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.