अभिजीत सावंतच पहिलं वहिल गुजराती गाणं !
यंदाच्या नवरात्रीसाठी अभिजीतच प्रेक्षकांना खास गिफ्ट !
इंडियन आयडॉल ते आज गायन विश्वात 20 वर्ष पूर्ण करत असताना गायक अभिजीत सावंत अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग करताना दिसतोय. इंडियन आयडॉल पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिजीत सावंत आता गुजराती गाण्याचा माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
नवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीत ने गायलेल पहिलं वहिल
गुजराती मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. प्रेमरंग सनेडो अस या गाण्याचं नाव असून आता गुजराती प्रेक्षकांना देखील अभिजीतच्या आवाजाची जादू अनुभवयाला मिळणार आहे.
या नव्या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत सांगतो " एखादं छान गुजराती फेस्टिवल गाणं करण्याची माझी आधी पासून इच्छा होती. प्रेमरंग सनेडो सारखं गरब्याच गाणं करताना एक छान अनुभव मिळाला सोबतीला नव्या भाषेत प्रयोग करण्याची संधी मिळाली.गुजराती गाण्याला थोडा आपला मराठमोळा ठसका देऊन या गाण्याची रचना केली असून दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती एकत्र घेऊन हे गाणं शब्दबध्द करण्यात वेगळीच गंमत होती आणि ती या निमित्ताने अनुभवली"
अभिजीत ने आजवर अनेक सदाबहार गाण्यानी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आता तो गुजराती प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झाला आहे.

