Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वानंदीचा निर्णय, समरची प्रतिक्रिया आणि घरात पोहोचले पोलिस!

*स्वानंदीचा निर्णय, समरची प्रतिक्रिया आणि घरात पोहोचले पोलिस!*



*“वीण दोघातली ही तुटेना”* मालिकेत सध्या भावनांचा खेळ सुरु आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आश्रमातील समस्या हाताळताना स्वानंदीने कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी तिने थेट वकीलांची मदत घेतली. तिच्या या निर्णयाला आश्रमातील अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला आणि सर्वांनी एकत्र येऊन भविष्याचे निर्णय एकमताने घेण्याचा निर्धार व्यक्त केला. दुसरीकडे, समरच्या घरी अधिराच्या स्थळ पाहण्याचा ठरलंय. काकू समरला या कार्यक्रमासाठी वेळेत घरी पोहोचण्याची विनंती करते. समर निघालाही आहे पण रस्त्यात त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येत. सुष्मिता आणि तिच्या आईचा रस्त्यात अपघात होतो. दोघींची अवस्था चिंताजनक नसली तरी यामुळे समर घरी वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुटुंबीयांचा समरवरचा रोष वाढतो.  त्याचवेळी स्वानंदीला रोहनचा फोन येतो. रोहनच्या प्रमोशनची बातमी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते आणि स्वानंदी त्याच यश साजर करण्यासाठी घरातच एक छोटंसं सेलिब्रेशन आयोजित करते. आता समरचा संयम तुटलाय. घरातल्या घटनांवर आणि स्वतःवर होणाऱ्या दबावामुळे त्रस्त होऊन तो थेट कमिशनर साहेबांना कॉल करून स्वानंदीच्या घरातल्या विरुद्ध तक्रार दाखल करतो. या धक्कादायक निर्णयाचा परिणाम फारच गंभीर आहे. सेलिब्रेशनच्या मधेच पोलीस घरात पोहोचतात आणि स्वानंदीच्या आई, सुष्मिताला चौकशीसाठी घेऊन जातात.



*स्वानंदीसाठी हा कसोटीचा काळ सुरू आहे. समरला आपल्या कृतीचा पच्याताप होईल?  हे कुटुंब पुन्हा एकत्र येईल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी बघत राहा  वीण दोघातली ही तुटेना सोम ते शनि रात्री ८:३० वा.फक्त सदैव तुमच्या झी मराठी  वाहिनीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.