Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तारिणी’चा प्रेस लॉन्च मध्ये प्रमोशनल गाण्याच्या दमदार सादरीकरणासह मर्दानी खेळात शिवानी सोनारचा पराक्रमी अवतार!

*‘तारिणी’चा प्रेस लॉन्च मध्ये प्रमोशनल गाण्याच्या दमदार सादरीकरणासह मर्दानी खेळात शिवानी सोनारचा पराक्रमी अवतार!*



प्रेक्षकांच्या मनामनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या *झी मराठी* ने पुन्हा एकदा एका आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी शैलीत आपल्या नव्या मालिकेचा भव्य प्रेस लॉन्च केला. *‘तारिणी’* ही मालिका ११ ऑगस्टपासून, रात्री ९:३० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.



या खास प्रसंगी तारिणी म्हणजेच नायिका शिवानी सोनार हिने एक शक्तिशाली आणि रंजक सादरीकरण केलं आणि सर्वांची मने जिंकली. "मर्दानी खेळ" या पारंपरिक आणि धाडसी युद्धकलेचे थरारक प्रात्यक्षिक शिवानीने 'दिवंगत यशवंत वस्ताद शिवकालीन मर्दानी आखाडा, वेतोशी, रत्नागिरी' या सर्व महिलांच्या समूहासोबत सादर केले. यानंतर मालिकेचं विशेष विडिओ टायटल गाणं सर्वांसमोर सादर करण्यात आलं. या गाण्यावर सगळ्या कलाकारांनी हुक स्टेप एकत्रितपणे  सादर करत उपस्थितांच्या उत्साहात भर घातली. ‘तारिणी’ हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.  बळ, परंपरा आणि स्त्रीत्वाचे शक्तिशाली दर्शन घडवणारी कथा. स्वाभिमान, लढवय्या वृत्ती आणि मातृभूमीप्रती असलेल्या निष्ठेचा साक्षात्कार या मालिकेतून प्रेक्षकांना होणार आहे.



 *शिवानी सोनार* हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितल "या गाण्याच्या शूटिंगसाठी मुंबईतील काही ऐतिहासिक ठिकाणी आम्ही चित्रीकरण केलं. त्या ठिकाणी उभं राहून 'तारिणी'च्या रूपात साद घालणं हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. आज जेव्हा हे गाणं सर्वांसमोर सादर झालं, तेव्हा संपूर्ण टीमने तीच ऊर्जा पुन्हा अनुभवली. त्याबरोबर मर्दानी आखाड्याच्या सर्व महिलांबरोबर सराव करणं आणि  प्रात्यक्षिक सादर करणं हा केवळ एक परफॉर्मन्स नव्हता ती एक शिकवण होती. त्या प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यांतली धग, मनगटातली ताकद आणि परंपरेसाठी असलेली निष्ठा मला प्रेरणा देऊन गेली."



*या निमित्ताने झी मराठीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की मालिकेचा शुभारंभ हा केवळ एक कार्यक्रम नसतो, तर तो एक अनुभव असतो. प्रेक्षक, कलाकार आणि परंपरेला एकत्र बांधणारा अनुभव. ‘तारिणी’च्या निमित्ताने झी मराठीने एक प्रेरणादायी आणि प्रासंगिक विषय मांडत स्त्रीशक्तीच्या नव्या रूपाची ओळख करून दिली आहे.*



*तेव्हा बघायला विसरू नका ‘तारिणी’ ११ ऑगस्टपासून, सोम- शुक्र  रात्री ९:३० वाजता, सदैव तुमच्या झी मराठीवर!*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.