Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रभाकर मोरे म्हणतायत... 'शालू झोका दे गो मैना'

*प्रभाकर मोरे म्हणतायत... 'शालू झोका दे गो मैना'*


*'शालू झोका दे गो मैना' गाण्यात प्रभाकर मोरे यांच्यासह झळकली धनश्री काडगावकर*

*'लास्ट स्टॉप खांदा... चित्रपटातील "शालू झोका दे गो मैना' गाण सोशल मीडियावर लॉन्च*

*आनंद शिंदे यांच्या आवाजातील  'शालू झोका दे गो मैना'*



'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून अभिनेते प्रभाकर मोरे यांचं 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. आता हे गाणं 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार असून,नुकतेच हे गाणं सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे. अभिनेते प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यावर हे गाणं  चित्रित करण्यात आले असून  'लास्ट स्टॉप खांदा' हा संगीतमय चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी "लास्ट स्टॉप खांदा... " प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदिप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे.


"लास्ट स्टॉप खांदा..." प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटात संगीतमय प्रेमकहाणी पाहता येणार आहे. अतिशय रंजक पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळेच प्रभाकर मोरे यांचं "शालू झोका दे गो मैना" हे गाणं खास ठरणार आहे. श्रमेश बेटकर यांनी लिहिलेलं हे गाणं किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर आनंद शिंदे यांनी त्यांच्या सदाबहार आवाजात हे गाणं गायलं आहे.  त्यामुळे आता केवळ प्रभाकर मोरेच नाही, तर अवघा महाराष्ट्र "शालू झोका दे गो मैना" म्हणत त्यावर थिकरणार आहे यात शंका नाही.



"लास्ट स्टॉप खांदा..." प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट  चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश काप्रेकर , प्रियांका हांडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांचे असून संकलन सुनील जाधव यांचे आहे तर कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे. नृत्यदिग्दर्शक राहुल बनसोडे आणि रवी आखाडे यांचे असून कार्यकारी निर्माता म्हणून विशाल खंदारे यांनी काम पाहिले आहे.


*Song Link*


https://youtu.be/Hbgz8RMOcPI?si=9nknyXSb3DJU8KYA


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.