Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कलाकार विसर्जनादरम्‍यान गणपती बाप्‍पाला निरोप देताना भावूक झाले!

 कलाकार विसर्जनादरम्‍यान गणपती बाप्‍पाला निरोप देताना भावूक झाले! 



एण्‍ड टीव्‍ही कलाकारांनी त्‍यांच्‍या बालपणीच्‍या गणपती बाप्‍पाच्‍या विसर्जन अनुभवांना उजाळा दिला, तसेच आज बाप्‍पाचे विसर्जन करताना त्‍यांच्‍या मनात जागृत झालेल्‍या भावनांबाबत सांगितले, ज्‍यामध्‍ये जुन्‍या आठवणी, कृतज्ञता आणि भक्‍ती सामावलेली आहे. हे कलाकार आहेत पारस अरोरा (जीतू, 'घरवाली  पेडवाली'), सपना सिकरवार (बिमलेश, 'हप्‍पू की उलटन पलटन') आणि रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी, 'भाबीजी घर पर है'). आगामी मालिका 'घरवाली पेडवाली'मध्‍ये जीतूची भूमिका साकारणारे पारस अरोरा म्‍हणाले, ''मला आठवते, बालपणी मी गणपती बाप्‍पाला विसर्जन घाटवर घेऊन जाताना माझ्या वडिलांचा हात धरत ढोल-ताशांच्‍या तालावर नाचायचो आणि माझ्या मित्रांसोबत जोरजाराने 'गणपती बाप्‍पा मोरया' म्‍हणायचो. तेव्‍हा आसपासचे सर्व लोक एकत्र आल्‍यासारखे वाटायचे आणि बाप्‍पाचा निरोप घेताना भावूक व्‍हायचो, ती ऊर्जा शब्‍दांमध्‍ये सांगता येऊ शकत नाही. आज, ही भावना अधिक आध्‍यात्मिक व वैयक्तिक आहे. मी आजही त्‍याच उत्‍साहासह नाचतो, पण आता मला प्रबळ नाते जाणवते, जेथे मला माझ्या जवळच्‍या नातेवाईकाचा निरोप घेत असल्यासारखे वाटते आणि त्‍यामध्‍ये पुढच्‍या वर्षी पुन्‍हा बाप्‍पाचे आगमन करण्‍याची आशा असते. वयासह आलेल्‍या परिपक्‍तवेमुळे मला विसर्जनाचा खरा अर्थ समजला आहे: लहान-लहान गोष्‍टींकडे दुर्लक्ष करणे, विश्वास ठेवणे आणि कृतज्ञतेसह जीवनाचा आनंद घेणे.''  



मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील सपना सिकरवार ऊर्फ बिमलेश म्‍हणाल्‍या, ''मी लहान असताना गणपती बाप्‍पाच्‍या विसर्जनाला नाचत, पाणी उडवत, मिठाईचा आस्‍वाद घेत धमाल करायची आणि माझ्या चुलत भावंडांसह सणाचा आनंद घ्‍यायची. मी कधीच भावूक झाले नाही. आजही यामध्‍ये बदल नाही. पण बाप्‍पाचा निरोप घेताना डोळ्यांमध्‍ये अश्रू येतात. असे वाटते की, कुटुंबातील लाडक्‍या सदस्‍याचा निरोप घेत आहे. वाढत्‍या वयासह मला समजले आहे की, हा फक्‍त सण नाही तर बाप्‍पासोबत दृढ नाते तयार करण्‍याचा क्षण आहे. बाप्‍पाचे आगमन करण्‍याचा आनंद कायम लक्षात राहतो, पण बाप्‍पाचा निरोप घेताना मी खूप भावूक होऊन जाते. आजही माझा विश्वास आहे की बाप्‍पा कधीच आपल्‍याला सोडून जात नाही, त्‍याचा आशीर्वाद वर्षभर आपल्‍यासोबत असतो.'' मालिका 'भाबीजी घर पर है'मधील रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ''बालपणी माझ्या मूळगावामध्‍ये बाप्‍पाचे जल्‍लोषात विसर्जन केले जायचे. 




मी माझ्या मित्रांसोबत धावत जायचो, पावसात भिजत मोठ्याने गाणी गायचो आणि तो क्षण कधीच संपू नये असे वाटायचे. मला या सणाची सखोलता कधीच समजली नाही, कारण त्‍यावेळी फक्‍त धमाल करायचो. पण आज घरामध्‍ये २४ वर्षांपासून गणपती बाप्‍पाचे आगमन करत सण साजरा करत आहे, ज्‍यामुळे बाप्‍पाचा निरोप घेताना खूप भावूक होतो. बाप्‍पाचे विसर्जन केल्‍यानंतर मन दुखावल्‍यासारखे वाटते. आम्‍ही ११ दिवस बाप्‍पाची कुटुंबातील सदस्‍याप्रमाणे सेवा करतो आणि अचानक बाप्‍पाचा निरोप घेण्‍याचा क्षण येतो. तो क्षण खूप अवघड असतो. पण त्‍यासोबत विसर्जन आपल्‍याला दुरावा, निष्‍ठा व आशेची शिकवण देते. दरवर्षी मी 'गणपती बाप्‍पा मोरया, पुढच्‍या वर्षी लवकर या' म्‍हणतो तेव्‍हा ते माझ्या मनात येते.''    



पहा तुमच्‍या आवडत्‍या मालिका दर सोमवार ते शुक्रवार, मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन' रात्री १० वाजता, 'भाबीजी घर पर है' रात्री १०.३० वाजता आणि 'घरवाली पेडवाली' लवकरच फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.