Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"मला शांतता आवडते आणि गोष्टींत पारदर्शकता असावी असं वाटतं" – तेजश्री प्रधान*

*"मला शांतता आवडते आणि गोष्टींत पारदर्शकता असावी असं वाटतं" – तेजश्री प्रधान*


नवरात्री म्हणजे देवीच्या नऊ रूपांची पूजा, नऊ शक्तींची आराधना. दररोज देवीच एक वेगळ रूप पूजल जात आणि प्रत्येक रूप वेगवेगळ्या गुणधर्मांचं प्रतीक असतं. आपल्या जीवनात नवदुर्गेचे गुण अंगीकारणं ही काळाची गरज बनली आहे. झी मराठीवरील *'वीण दोघातली ही तुटेना'* या लोकप्रिय मालिकेतील स्वानंदीची भूमिका साकारणारी *अभिनेत्री तेजश्री प्रधान* हिने नवरात्रीच्या निमित्ताने तिच्या आयुष्यातील एक भावनिक आणि प्रेरणादायी बाजू शेअर केली. तेजश्री म्हणते, "मी महागौरी देवीशी रिलेट करू शकते. तिच्यात असलेली शुद्धता आणि शांततेची भावना मला खूप भावते आणि मी त्या आत्मसाद करण्याचा प्रयत्न करते. हेच गुण मी माझ्या आयुष्यात आणि निर्णयांमध्ये अंगीकारायचा प्रयत्न करते. मला शांतता आवडते आणि गोष्टी पारदर्शक असाव्यात असं वाटतं."



महागौरी हे देवीचं आठवं रूप असून तीची पवित्रता, सौम्यता आणि अंतःकरणातील निर्मळतेचं प्रतीक मानली जाते. तेजश्री प्रधान हिच्या या विचारातून हे स्पष्ट होतं की, यशस्वी आणि समतोल आयुष्य जगण्यासाठी आपण बाह्य तेजाइतकीच आत्मिक शुद्धता आणि शांती या गुणांचाही स्वीकार केला पाहिजे.


तेजश्रीची ही सकारात्मक भूमिका आणि विचार नवदुर्गांच्या आदर्श गुणांना आजच्या युगातही किती समर्पक आहेत, हे अधोरेखित करतात. या नवरात्रीत, तेजश्री प्रमाणेच आपणही आपल्या जीवनात महागौरीसारखी शुद्धता, शांतता आणि पारदर्शकता रुजवू या. 

 

*बघत राहा 'वीण दोघातली ही तुटेना'  सोम- शनि संध्या ७:३० वा. फक्त झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.