Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*चित्रनगरीच्या `बाप्पा'च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान!*

 *चित्रनगरीच्या `बाप्पा'च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान!*

*दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला चित्रसंवाद* 



*मुंबई, ता. ३* : गेल्या ३२ वर्षांपासून दादासाहेब फाळके चित्रनगरीची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या चित्रसंवाद कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते मराठी कलाकार व माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला. 


यंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने राज्यभरात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे `चित्रनगरीच्या राजा'ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्यात कलाकारांसोबत चित्रसंवाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेक्षेत्रातील अभिनेता सुशांत शेलार, प्रमोद पवार, संदीप पाठक, महेश लिमये, दिग्दर्शक दीपक पाटील, गायक रोहित राऊत, अभिनेत्री मेघा धाडे, श्रेया बुगडे, भार्गवी चिरमुले, तेजस्विनी लोणारे, अक्षया गुरव, दैवता पाटील, निवेदिका मानसी सोनटक्के, याचबरोबर घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. त्याच बरोबर सिने समीक्षक डॉ.संतोष पाठारे, जेष्ठ पत्रकार शीतल करदेकर, संपादक सचिन परब, नीला टेलिफिल्मचे असिद मोदी, विस्लिंग वूडसचे चैतन्य चिंचलीकर, फ्राइम फोकसचे सुनील धैया, बॉलिवूड पार्कचे संतोष मिजगर,निर्माता महामंडळाचे बाळासाहेब गोरे, देवेंद्र मोरे, कलादिग्दर्शक डॉ. सुमीत पाटील, तसेच मुंबईतील विविध महामंडळांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 



यावेळी चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.