Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सन मराठी नवरात्रोत्सव २०२५' कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

 *'सन मराठी नवरात्रोत्सव २०२५' कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार*


नवरात्र म्हटलं की भक्तीचा उत्साह, नृत्याचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि आनंदाची पर्वणी! हाच आनंद अधिक रंगतदार करण्यासाठी ‘सन मराठीचा नवरात्रोत्सव २०२५’ रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय सोहळा घेऊन येतो आहे.



या सोहळ्यात सुप्रसिद्ध लोककलाकार नंदेश उमप आपल्या दमदार आवाजात पोवाडा सादर करून प्रेक्षकांना रोमांचित करणार आहेत. त्यांच्या पोवाड्यातून मराठी मातीचा अभिमान, पराक्रमाची झलक आणि संस्कृतीची श्रीमंती अनुभवता येणार आहे. त्याचसोबत लोकप्रिय अभिनेत्री वैदही परशुरामी नाट्यमय मांडणीद्वारे ‘स्त्रीचा प्रवास’ प्रेक्षकांसमोर सजीव करणार आहे. स्त्रीची जिद्द, संघर्ष आणि विजयाचा प्रवास या नाट्यातून प्रभावीपणे उभा राहणार आहे. या बहारदार सोहळ्याची आणखी एक खास भेट म्हणजे ‘द कोकण कलेक्टिव्ह’ ग्रुप. आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीत ते गाण्यांची जादू पसरवून रसिकांना संगीताच्या सुरेल दुनियेत घेऊन जाणार आहेत.


इतकंच नव्हे, तर 'सन मराठी'चे लाडके कलाकार  खास सादरीकरण घेऊन येणार आहेत.  तेजा म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाई  जोगवा सादर करणार आहे. . त्याचबरोबर मालिकेतील काही कलाकार रंगतदार गरबा नृत्य सादर करून नवरात्रीच्या जल्लोषात रंग भरतील. हा संपूर्ण कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी मोफत खुला असून, ११ सप्टेंबर रोजी सायं. ६:३० वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर, सिद्धिविनायक मंदिराजवळ रंगणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.