Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुपरस्टार महेश बाबूने डेन्व्हर ऑटोग्राफ एमबी कलेक्शन सादर केले

 सुपरस्टार महेश बाबूने डेन्व्हर ऑटोग्राफ एमबी कलेक्शन सादर केले

मुंबई, २४ सप्टेंबर २०२५: भारताचा प्रतिष्ठित मेन्स फ्रॅगरन्स ब्रॅंड डेन्व्हरने सुपरस्टार महेश बाबूशी सहयोग करून ऑटोग्राफ एमबी कलेक्शनचा प्रचार करण्यासाठी एक ब्रॅंड फिल्म लॉन्च केली आहे. ऑटोग्राफ एमबी कलेक्शन ही एक लक्झरी यू डी पर्फ्यूम्सची श्रेणी आहे, ज्यामध्ये महेश बाबूची अनोखी स्टाइल आणि वृत्ती तसेच या प्रतिष्ठित स्टारचा सुसंस्कृतपणा झळकतो. आपल्या भावपूर्ण आवाजात महेश बाबू या पर्फ्यूम श्रेणीचा परिचय आपल्याला करून देतो आणि एक सुगंधी अनुभव खुला करतो.

हे लॉन्चिंग विशेष असण्याचे कारण म्हणजे ऑटोग्राफ एमबी कलेक्शन हे डेन्व्हर आणि महेश बाबू यांनी एकत्रितपणे निर्मिलेले उत्पादन आहे. ते डेन्व्हरच्या पोर्टफोलियोमध्ये आकांक्षांची चरमसीमा दर्शविते. या ब्रॅंडच्या प्रॉडक्ट लाइन-अपमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या या लिमिटेड एडिशन श्रेणीत मंडे मॅग्नेट, सॅटर्डे सनसेट आणि विकेड वेनसडेचा समावेश आहे. सुगंध कलात्मकतेमध्ये उत्कृष्टता शोधणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले हे एक प्रीमियम ऑफरिंग आहे.

या लॉन्च प्रसंगी बोलताना एचएसपीएलचे एमडी आणि सीईओ सौरभ गुप्ता म्हणाले, “आम्ही जेव्हा आमच्या मागच्या शूटच्या वेळेस महेश सरांना भेटलो, तेव्हा मी ही कल्पना मनातून काढून टाकली होती. ते अचूकतेचे भोक्ते आहेत, मनावर राज्य करणारे राजकुमार आहेत- विनम्र, साधे पण महान आहेत आणि सतत सुपरहिट्स देत आहेत. त्यांची ही सिद्धी साजरी व्हायला हवी असे वाटले. एक फ्रॅगरन्स ब्रॅंड म्हणून ‘ऑटोग्राफ कलेक्शन ब्रॅंड’ त्यासाठी आम्हाला सुयोग्य वाटला. पण आम्हाला तो आणखी उन्नत करण्याची इच्छा होती. ही श्रेणी महेश सरांच्या प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवते- जेथे एक साधीशी सही ऑटोग्राफ होऊन जाते! ही श्रेणी यश, आकांक्षा आणि लक्झरीचे प्रतीक आहे.”





सुपरस्टार महेश बाबू यांनी सांगितले की, “मी २०१८ पासून डेन्व्हरशी संलग्न आहे आणि ते प्रत्येक वेळी एक अशी कल्पना घेऊन येतात, जी वेगळी आणि अनोखी असते. एक प्रतिष्ठित कलेक्शनची सह-निर्मिती करून ते लॉन्च करण्याचा विचार खरोखर रोमांचक होता. डेन्व्हरने लक्झरीची नवी व्याख्या केली आहे आणि त्याचबरोबर आपली उत्पादने सहजप्राप्य ठेवली आहेत. यश साजरे करण्याची त्यांची कल्पना लगेच भावली. त्यामुळे या प्रवासात सहभागी होण्याची प्रेरणा मला मिळाली. ऑटोग्राफ एमबी कलेक्शनची निर्मिती ज्या पॅशनने झाली आहे, त्याच पॅशनने तुम्ही त्याचे स्वागत कराल, अशी आशा आहे.”

ऑटोग्राफ एमबी कलेक्शन सुपरस्टार महेशबाबूची यशोगाथा साजरे करते. महेश बाबूने आपल्या सोशल हॅंडलवर एका वेधक फिल्मसह या कलेक्शनचे अनावरण केले आणि त्यास ‘माय साईन ऑफ सक्सेस’ म्हटले. या लॉन्चसह डेन्व्हरच्या नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे आणि प्रीमियम फ्रॅगरन्स सेगमेन्टमध्ये डेन्व्हर आपली उपस्थिती विस्तारित करत आहे. चरित्र आणि सुसंस्कृतपणाला महत्त्व देणाऱ्या पुरुषांसाठी डिझाईन करण्यात आलेले हे कलेक्शन एक संवेदी प्रवास सादर करते, जो खरोखर आगळावेगळा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.