Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सिनेइंडस्ट्रीमध्ये नवा चेहरा, पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन*

 *सिनेइंडस्ट्रीमध्ये नवा चेहरा, पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन* 

*सिनेइंडस्ट्रीला मिळाला नवा चेहरा, 'आरपार' चित्रपटातून समोर*



*'आरपार' चित्रपटात ललित-ऋतासह जान्हवी सावंतच्या भूमिकेची चर्चा, नवोदित अभिनेत्रीचे लक्षवेधी पदार्पण*


मराठी सिनेविश्वात असे अनेक नवोदित कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. बरेचदा या कलाकारांची पहिलीच एंट्री अनेकांना भावते. आणि आजही ही आपली मराठी 

इंडस्ट्री अनेक नव्या चेहऱ्यांना मोठं होण्याची संधी देते. अर्थात आपल्या इंडस्ट्रीची ही बाब वाखाणण्याजोगी आहे. अशातच आता एका मराठमोळ्या नवोदित चेहऱ्याच्या एंट्रीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी सावंत. सध्या चर्चेत असलेल्या 'आरपार' या चित्रपटातून जान्हवीने सिनेविश्वात पदार्पण केलं आहे.


'आरपार' चित्रपटात ऋता-ललितसह चित्रपटातील इतरही कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाची उंची वाढविली. दरम्यान, चित्रपटात झळकलेल्या नव्या चेहऱ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं. ही नवी अभिनेत्री नक्की कोण?, असा प्रश्नही साऱ्यांना पडला. तर अभिनेत्री जान्हवी सावंत हिने 'आरपार' सिनेमातून सिनेविश्वात एंट्री केली. जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांना अधिक भावली. अभिनेत्री जान्हवी सावंत हा प्रवास आता जान्हवीने 'आरपार' या सिनेमातून सुरु केला आहे. या चित्रपटात तिने ललितची होणारी पत्नी ही भूमिका साकारली, मात्र ही भूमिका चित्रपटात ट्विस्ट येताच दूर गेली. तिची भूमिका, तिचा अभिनय, तिचे व्यक्तिसौंदर्य सारे काही प्रेक्षकांना भावले आणि आरपारमुळे जान्हवीला विशेष प्रेम मिळाले. नवोदित अभिनेत्री म्हणून जान्हवीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. 



एकूणच या प्रवासाबाबत जान्हवी म्हणाली, "'आरपार'मुळे मला सिनेइंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली याबाबत मी साऱ्यांची ऋणी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्यांदाच अभिनय करताना खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली हे माझं भाग्यच म्हणायला हवं. 'आरपार' चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने सिनेविश्वातील मार्ग मोकळे करुन दिले आहेत. आता आणखी बऱ्याच प्रोजेक्टवर काम करायचं आहे आणि मी उत्सुक आहे".

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.