Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जय जय स्वामी समर्थ मालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या महाप्रश्नाची "उकल" !

 जय जय स्वामी समर्थ मालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या महाप्रश्नाची "उकल" ! 



प्रपंच कि परमार्थ... कि प्रपंचाच्या सोबतीने परमार्थ?

पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 


मुंबई, २० ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवाच्या उत्साहात कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत प्रत्येक प्रेक्षकांला आपली वाटेल अशी एक नाट्यमय गोष्ट पाहायला मिळणार आहे. या गोष्टीतला प्रश्न आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला येतो,समोर उभा ठाकतो.  प्रपंच कि परमार्थ.. कि प्रपंचाच्या सोबतीने परमार्थ?, या प्रश्नाबद्दल गणरायाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वामी जे मार्गदर्शन करतात, ते आजवर कधीही न घडलेले आहे. देवाची भक्ती, आध्यात्मिक ओढ मात्र समोर कौटुंबिक जबाबदाऱ्या, कुटुंबाच्या अपेक्षा, आणि त्यातून मनाची होणारी चलबिचल हा जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात उभा राहणारा प्रश्न आहे. या प्रश्नाची उकल स्वामी अनोख्या पद्धतीने या गणेशोत्सवात करणार आहेत.हे कसे घडून येणार, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा “जय जय स्वामी समर्थ” दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.



अक्कलकोटचे स्वामीभक्त दिगंबरपंत आपल्या संसाराची गाडी मुलगा गोमुखच्या विवाहाने मार्गी लागावी अशी गणपतीपुढे प्रार्थना करतात. मात्र गोमुख गणेशभक्तीत इतका रंगतो की विवाह हा परमार्थाच्या आड येतो अशी त्याची धारणा होते. संसाराकडे नकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या या भूमिकेमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं.

भक्तीत रंगलेला तो संसाराला नाकारतो, तर कुटुंबियांच्या अपेक्षा आणि नाती त्याच्या समोर उभी ठाकतात. सख्ख्या बहिणीच्या स्वार्थी डावापासून ते होणाऱ्या बायको पालवीच्या हळव्या नजरेपर्यंत प्रत्येक नातं त्याच्या पुढे वेगळी कसोटी निर्माण करतं. या द्वंद्वातून गोमुखचं आयुष्य नाट्यमय वळण घेतं. पावलोपावली स्वामींचे संकेत त्याला मिळतात. 



स्वामींच्या लीलेतून उमटणारा खरा अर्थ त्याला उमजतो का? त्यातून नेमकी कोणती शिकवण मिळते ? स्वामी गोमुखला आणि त्याच्या कुटुंबाला नेमका कोणता संदेश देतात?  प्रपंच की परमार्थ? की प्रपंचाच्या सोबतीने परमार्थ? स्वामींचा या प्रश्नावरचा उपदेश काय असेल, हे पाहणं आणि त्यात गणेशोत्सवाचा साग्रसंगीत  उत्सव अनुभवणं, प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभूती ठरणार आहे.


तेव्हा मालिकेत हे सगळे घडणारे महानाट्य जाणून घेण्यासाठी पहा जय जय स्वामी समर्थ’  दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.