Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एण्‍ड टीव्‍हीवरील अलौकिक शक्‍तीसंदर्भातील विनोदी मालिका ‘घरवाली पेडवाली'मध्‍ये रिचा सोनी रीटाच्‍या भूमिकेत!

 एण्‍ड टीव्‍हीवरील अलौकिक शक्‍तीसंदर्भातील विनोदी मालिका ‘घरवाली पेडवाली'मध्‍ये रिचा सोनी रीटाच्‍या भूमिकेत! 



एण्‍ड टीव्‍हीवरील आगामी नवीन मालिका ‘घरवाली पेडवाली' हास्‍य, भयावह सरप्राइजेज आणि भावनांच्‍या धमाल रोलरकोस्‍टरचे मनोरंजन देण्‍यास सज्‍ज आहे. या नवीन संकल्‍पनेमध्‍ये मोहकतेची भर करत आहेत प्रतिभावान अभिनेत्री रिचा सोनी, ज्‍या सकारात्‍मक असलेली ग्‍लॅमरस, स्‍पष्‍टवादी व फॅशनप्रेमी महिला रीटाची भूमिका साकारणार आहेत. आधुनिक व उत्‍साही सासू रीटा मालिकेच्‍या कथानकामध्‍ये विनोद, उत्‍साह व ड्रामाचे अद्वितीय मिश्रण घेऊन येईल, ज्‍यामुळे ती या असामान्‍य लव्‍ह ट्रायंगलचा अद्वितीय भाग आहे.  


या भूमिकेबाबत आनंद व्‍यक्‍त करत रिचा सोनी म्‍हणाल्‍या, “रीटा उत्‍साही भूमिका आहे, मी यापूर्वी साकारलेल्‍या भूमिकांपेक्षा ही भूमिका अत्‍यंत वेगळी आहे. ती आधुनिक, स्‍टायलिश व स्‍पष्‍टवक्ता आहे, तसेच प्रेमळ असण्‍यासोबत तिच्‍या कुटुंबाची काळजी घेते. मला या भूमिकेबाबत आवडलेली बाब म्‍हणजे ती जीवनाकडे सकारात्‍मक दृष्टिने पाहते आणि तिच्‍या मोहकतेने अवतीभोवती असलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रभावित करते. ती विशिष्‍ट शिस्‍तबद्ध सासू नाही, तर सहाय्यक, उत्‍साही असण्‍यासोबत तिच्यात खूप विलक्षणता सामावलेली आहे. मी स्‍वत: रीटा सारख्‍या संरक्षणात्‍मक स्‍वभावाशी जुळून जाते. मी देखील माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेते. तिची भूमिका साकारताना उत्‍साहवर्धक वाटते, तसेच मला माझी विनोदी व ग्‍लॅमरस बाजू सादर करण्‍याची संधी मिळाली आहे, जी प्रेक्षकांनी कधीच पाहिलेली नाही.''  



या मालिकेबाबत उत्‍सुक असलेल्‍या त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, “मालिका ‘घरवाली पेडवाली'च्‍या संकल्‍पनेने माझे त्‍वरित लक्ष वेधून घेतले. मालिकेच्‍या शीर्षकामधूनच उत्‍सुकता जागृत होते आणि कथानकामध्‍ये सामावून गेल्‍यानंतर त्‍यामध्‍ये विनोद, अलौकिक शक्‍तीसंदर्भातील मनोरंजन व कौटुंबिक ड्रामाचा आनंद मिळेल. रीटाची भूमिका बारकाईने व धमाल रचण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे मला हीच भूमिका साकारण्‍याची माझी इच्‍छा असल्‍यासारखे वाटले.''   

पहा रिचा सोनी यांना रीटाच्‍या भूमिकेत मालिका ‘घरवाली पेडवाली'मध्‍ये लवकरच फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.