Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

व्हा Creative, व्हा Active*

*व्हा Creative, व्हा Active*


आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस हा रोजच लहान मोठ्या तणावाला सामोरा जात आहे. त्यात लहान मुलं ही तितकीच समाविष्ट आहेत. या स्पर्धेच्या युगात मुलांना शाळेत प्रमाणापेक्षा जास्त अभ्यासाचा ताण आहे.



मोबाइलच्या अतिवापरामुळे सगळेचजण शारिरीक आणि मानसिक त्रासाला बळी पडत आहेत. मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे तर्कशुद्ध विचार, भाषा, अनुशासन, क्रमबध्दता याचा विकास कुठेतरी थांबला जातो आहे. आपल्या शरीरावर होणारा हा ऱ्हास दिवसेंदिवस वाढतच जात आहे पण तो भरून काढला जात नाहीये. तो भरून काढणं ही आता काळाची गरज आहे, आणि या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे, *“Left Brain Therapy.”*


याच सगळ्याचा विचार करून यंदा *“शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाने* आपल्या आयुष्यातील महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित होणारा विषय आपल्या समोर गणपती सजावटीत घेऊन आले आहेत ज्याच नाव आहे "व्हा Creative, व्हा Active". सजावट संकल्पना डॉ. सुमित पाटील याची आहे.  


Left brain therapy” ही एक मानसिक, वैचारिक आणि मेंदूच्या विशिष्ट भागाशी संबधित थेरपी आहे. जेव्हा व्यक्तीला अस्वस्थता, विस्कळीत विचार, चिंता किंवा निर्णय प्रक्रियेची अडचण जाणवते त्यावेळी या थेरपीचा वापर केला जातो. ज्यामध्ये माणसाच्या विचारशक्ती, युक्तिवाद,भाषा, अनुशासन, क्रमबद्धता यांचा विकास घडवून डाव्या मेंदूचे कार्य सुधारण्यास आपल्याला मदत होते.


नेहमीच काहीतरी अनोखा विषय मांडणाऱ्या या गणेश मंडळाची सजावट ही भाषा, उच्चार, वाचन, गणित, क्रमरचना, रंग, संज्ञात्मक थेरपी या प्रकाराची आहे. म्हणजेच इथे असणाऱ्या एका शब्द कोड्यातल्या वेगवेगळ्या अक्षरांतून गणपतीची नावे शोधणे,  वेगवेगळे रंग ठराविक रंगसंगतीने लावणे, वेगवेगळे आकार जोडून त्यातून तयार होणाऱ्या चित्रातील व्यक्तीं आपल्या दैनंदिन आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत हे समजून घेणे. एका चौकोनात फार वेगवेगळे आकार आहेत ज्यात ससा, कसव, घर, माकड, पक्षी, साप, माणूस, झाड असे आकार नीट लक्ष देऊन पहिलं तर अपल्या दिसतील. ज्याला जे जे आकार दिसतील त्यातून त्याने त्यावर कविता अथवा गोष्ट तयार करायची.  



ही अशी अगळ्या-वेगळ्या प्रकारची सजावट पूर्णपणे पर्यावरणपुरक तर आहेच पण दिव्यांगानाही ही सजावट अनुभता यावी म्हणून इथे रॅम्प आणि ब्रेल लिपीचा वापर केला आहे.  इथे असणारी सगळी चित्रं फार रंगीत आणि आकर्षित करणारी आहेत त्यामुळे इथे येणाऱ्या लहान मुलांचा वेळ फार मजेत जाऊन ते काही काळ स्क्रिन पासून लांब राहून इथे असणाऱ्या वेगवेगळ्या अँक्टिव्हिटीत छान रमतील . त्यांना असं रमलेलं पाहून त्यांच्या मेंदूची होणारी मशागत आणि या मंडळाचं घोषवाक्य “व्हा Creative व्हा Active” सार्थकी लागेल अशी आशा आहे. 


हे मंडळ फक्त इतक्यावरच थांबत नाही तर इथे येणाऱ्या गरजू भाविकांना आणि भटक्या विमुक्त जातीतील मुलामुलींना शालेय उपयोगी वस्तुचे दरवर्षी वाटप केलं जाते तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत (११ दिवस ) दररोज सकाळी के ईम, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी गरजू व्यक्तींना मोफत ब्रेकफास्ट ही दिला जातो. 


बुद्धी आणि शक्तीची देवता असणाऱ्या गणरायाकडून यंदाच्या या  उत्सवात  "Left Brain Therapy” म्हणजे काय हे सजावटी तुन अनुभवण्यासाठी आवर्जून “शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता या गणेश मंडळाला भेट दया. 

गणपती बाप्पा मोरया.....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.