*"रात्री २ वाजता गुलाबजामून खायचा या विचारानेच माझी झोप उडाली होती" - तेजश्री प्रधान*
*'वीण दोघातली ही तुटेना’ प्रोमो आवडेल याचा विश्वास होता...*
*'वीण दोघातली ही तुटेना’* या मालिकेतून *अभिनेत्री तेजश्री प्रधान* , स्वानंदीच्या भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीसोबत तेजश्रीचं खास नातं आहे. या नवीन मालिकेमुळे तेजश्री पुन्हा एकदा झी मराठीवर परत येत आहे, आणि त्याबद्दल तिच्या मनात विशेष आनंद आहे. मालिकेच्या प्रोमो शूट दरम्यान तिने तिच्या नव्या भूमिकेबद्दल आणि झी मराठीसोबत पुन्हा एकदा काम करण्याच्या आनंदाविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या. मी स्वानंदीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहे. स्वानंदी ही एक परिपक्व व्यक्तिरेखा आहे आणि ती परिस्थिती देखील परिपक्वतेने हाताळते.
टीम खूप छान बनली आहे. सहकलाकार ही मस्त आहेत त्यामुळे मालिकेचा प्रवास हा मजेशीर असणार आहे. या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा आनंदच झाला कारण कॉल करणारी माणसं आपली होती आणि नाही म्हणावं असं काही कारणच दिसलं नाही, टीम छान आहे, मालिकेचा विषय गोड आहे आणि पूर्वीची काही माणसं देखील एकत्र आली आहेत. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील कॅमेरा मागची काही तंत्रज्ञ टीम यात ही आहे. झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांशी खूप छान नातं निर्माण झालं आहे. जेव्हा प्रोमो आला तेव्हा त्यांच्या प्रेमाचा विश्वास होता कि प्रोमो आवडेल आणि त्यांनी उदंड प्रेम दिलं. सुबोध दादा सोबत काम करायला मिळत आहे याचा ही आनंद आहे. जेव्हा आमचा दुसरा प्रोमो आला त्याला ही छान प्रतिसाद मिळाला आणि मला त्या प्रोमो मागचा एक किस्सा सांगावासा वाटतो एक शॉट आहे जिथे स्वानंदीच्या ताटात गुलाबजामून आहे, *तो शॉट आम्ही रात्री २ वाजता शूट केला आहे. शूटिंग मध्ये एक शॉट खूप वेगळ्या ऍंगल्सनि शूट केला जातो आणि रात्री २ वाजता गुलाबजामून खायचा या विचारांनीच मला टेंशन आलं, माझी झोप उडाली होती. आम्ही त्या सीनसाठी एकूण ७ -८ गुलाबजामूनचा वापर केला* . त्याच प्रोमोच्यावेळी संपूर्ण टीम पहिल्यांदा भेटली. मी शेवटी हेच म्हणेन कि प्रेक्षकांना एक चांगली मालिका देण्याचा प्रयत्न असणार आहे."
*तेव्हा बघायला विसरू नका 'वीण दोघातली ही तुटेना' ११ ऑगस्ट पासून दररोज संध्या. ७:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*